शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

१६ ठिकाणचे पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:30 IST

ग्राम पंचायतस्तरावरील पाणी नमून्याची तपासणी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत केली जाते. जून महिन्यात १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५४५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार तालुक्यातील १६ पाणी नमुने दूषित आढळून आले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ९ हजार ४४७ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देअहेरी तालुका सर्वाधिक दूषित : सहा महिन्यांत ९ हजार ४४७ नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्राम पंचायतस्तरावरील पाणी नमून्याची तपासणी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत केली जाते. जून महिन्यात १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५४५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार तालुक्यातील १६ पाणी नमुने दूषित आढळून आले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ९ हजार ४४७ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.पिण्याच्या पाण्यासंदर्भात पावसाळ्यात प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. दूषित पाण्यापासून कॉलरा, ग्रस्ट्रो, अतिसार, हगवन, टायफाईड आदींसारखे आजार बळावतात. दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य लवकरच धोक्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नेहमी जनजागृती करून नागरिकांनी शुद्ध पाणी प्यावे, असे आवाहन केले जाते. प्रशासनाच्या वतीने दर महिन्यात ग्रामपंचायतस्तरावरील पाणी नमूने घेऊन त्याची तपासणी केली जाते. या तपासणीच्या अहवालानुसार संबंधित ग्रामपंचायतींना हिरवे, लाल, पिवळे अशा तीन प्रकारचे कार्ड दिले जातात. जून २०१८ मध्ये गडचिरोली तालुक्यातील २९९ पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी दोन नमूने दूषित आढळून आले. धानोरा तालुक्यातील ९० पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. यात एकही नमूना दूषित आढळला नाही. आरमोरी तालुक्यातील ३७५ पाणी नमून्यांपैकी ४ नमुने दूषित आढळून आले. देसाईगंज तालुक्यातील २०३ नमून्यांपैकी २ तर कुरखेडा तालुक्यातील १०४ नमून्यांपैकी ८ नमूने दूषित आढळून आले. उर्वरित कोरची, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या तालुक्यातील पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. मात्र एकही नमूना दूषित आढळून आला नाही. कोरची तालुक्यात २८, चामोर्शी तालुक्यातील २६३, मुलचेरा ३८, अहेरी ५२ व एटापल्ली तालुक्यातील ८३ तसेच भामरागड तालुक्यातील १० पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. सिरोंचा तालुक्यातून जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने जून महिन्यात एकही पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले नाही.गडचिरोली तालुक्यातील २ दूषित पाणी नमून्यातील दूषित पाण्याचे प्रमाण ०.६७ आहे. आरमोरी तालुक्याच्या ४ पाणी नमुन्याच्या तपासणीअंती दूषित पाण्याचे प्रमाण १.०७, देसाईगंजातील २ पाणी नमून्याच्या तपासणीअंती ०.९९, कुरखेडा तालुक्याच्या ८ पाणी नमूने तपासणीअंती दूषित पाण्याचे प्रमाण ७.६९ इतके आढळून आले. तपासणीनंतर पाण्यातील दूषिताचे प्रमाण ७ पेक्षा अधिक असल्यास ते धोक्याचे असते. त्यामुळे संबंधित गावांमध्ये जलजन्य आजार पसरण्याची शक्यता असते.पाच ग्रामपंचायतींना मिळाले लाल कार्डपाणी स्त्रोताच्या ठिकाणचे प्लॅटफॉर्म फुटलेले असणे, सभोवताल घाणीचे साम्राज्य तसेच नियमित पाणी दूषित येत असल्यास संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींना जि.प.आरोग्य विभागाच्या वतीने लाल कार्ड दिले जाते. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या पाणी स्त्रोताच्या सर्वेक्षणानुसार अहेरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले आहे. यामध्ये रेपनपल्ली, खांदला, राजाराम व नागेपल्ली, खमनचेरू आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींनी पाणी स्त्रोताच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, पाणी शुद्ध येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater pollutionजल प्रदूषण