शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यातील वीज प्रवाहाने 16 जनावरांचा मृत्यू, 33 बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 12:43 IST

अहेरीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या देवलमारी येथे रविवारी नाल्याच्या प्रवाहात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे 16 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

अहेरी (गडचिरोली) - अहेरीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या देवलमारी येथे रविवारी (8 सप्टेंबर) सकाळी नाल्याच्या प्रवाहात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे 16 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जनावरं पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी देवलमरी गावातील 15 शेतकऱ्यांची एकूण 49 जनावरे जंगलात चरण्यासाठी गेली होती. काही शेतकऱ्यांनी सर्व जनावरांना जंगलातून गावाकडे नेण्यासाठी सोडले. सर्व जनावरे गावाच्या लगत असलेल्या आवलमारी रस्त्यावरील नाल्याच्या पुराच्या पाण्यातून देवलमारी गावाकडे येत होती. मात्र पाण्यात विद्युत खांब बुडाल्याने पाण्यात विद्युत प्रवाह सुरू होता. यामुळे विद्युत धक्क्याने 16 जनावरे मृत्युमुखी पडली. त्यांचे मृतदेह सापडले असून अद्याप 33 जनावरांचा पत्ता लागला नाही. विद्युत धक्क्याने त्यांचाही मृत्यू होऊन ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मानवी जीवितहानी टळली

भोई समाजाचे लोक सकाळीच डोंगे बांधण्यासाठी नदीकडे जाणार होते, मात्र आज ते नदीकडे गेले नाही. त्यामुळे ते बचावले.विद्युत विभागाने पूरपरिस्थिती बघून वेळीच विद्युत प्रवाह बंद केला असता तर जनावरांची जीवितहानी टळली असती. एकूण 15 शेतकऱ्यांचे एकूण 49 जनावरांचे नुकसान झाले आहे अशी माहिती गावाच्या पटवारी भावना सोनकुसरे यांनी लोकमतला दिली.

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूRainपाऊस