शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वडसात १४४९ रुग्णांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:00 IST

गणेश मंडळ व संत निरंकारी मंडळाच्या वतीने शहरात आरोग्य शिबिर घेण्यात आले. गणेश मंडळाच्या शिबिरात ८६५ तर निरंकारी मंडळाच्या शिबिरात ५८४ अशा एकूण १ हजार ४४९ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देसंत निरंकारी व बाल गणेश मंडळाचा पुढाकार : ४०० नेत्र रुग्णांना चष्म्यांचे वाटप; आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गणेश मंडळ व संत निरंकारी मंडळाच्या वतीने शहरात आरोग्य शिबिर घेण्यात आले. गणेश मंडळाच्या शिबिरात ८६५ तर निरंकारी मंडळाच्या शिबिरात ५८४ अशा एकूण १ हजार ४४९ रुग्णांची तपासणी करण्यात आली.श्री साईबाबा बाल गणेश उत्सव मंडळ हनुमान/राजेंद्र वॉर्ड देसाईगंजच्या वतीने बुधवारी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, डोळ्यांचे विकार व दंत तपासणी करून रुग्णांना औषधींचे वितरण करण्यात आले. सदर शिबिरात ४०० नेत्र रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. या शिबिरात सर्व प्रकारच्या एकूण ८६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान नगराध्यक्ष शालू दंडवते, न.प.उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगरसेविका ठाकरे, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, महेश पापडकर, विलास साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिरात पायल मंगलानी, डॉ.झोहा पठाण, डॉ.किरण गाडेकर, डॉ.पवन आरगडे, डॉ.दीपक पाठे, डॉ.अश्विन ढोले, डॉ.पी.बी.घोरपडे, डॉ.सुनील फुडके, डॉ.मेधा आदींनी रुग्णांची तपासणी केली.संत निरंकारी मंडळातर्फे गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह कुरखेडा, कोरची, धानोरा, आरमोरी आदी तालुका मुख्यालयी दरवर्षी रक्तदान, आरोग्य शिबिर व इतर उपक्रम राबविले जातात. संत निरंकारी मंडळाच्या वतीने शासकीय रुग्णपेढीमध्ये वर्षभरात सर्वाधिक रक्तांच्या पिशव्या उपलब्ध करून दिल्या जातात.याप्रसंगी नागपूर येथील कॅन्सर नॅशनल इस्टिट्यूट, विदर्भ इस्टिट्यूट आॅफ सायन्स, विमस् हास्पिटल, शृष्टी नेत्र तसेच डी. डेंटल क्लिनिकचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी साईबाबा मंदिर व गणेश मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.श्री साईबाबा बाल गणेश उत्सव मंडळ हनुमान/राजेंद्र वॉर्ड देसाईगंजच्या वतीने बुधवारी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, डोळ्यांचे विकार व दंत तपासणी करून रुग्णांना औषधींचे वितरण करण्यात आले. सदर शिबिरात ४०० नेत्र रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. या शिबिरात सर्व प्रकारच्या एकूण ८६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान नगराध्यक्ष शालू दंडवते, न.प.उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगरसेविका ठाकरे, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, महेश पापडकर, विलास साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिरात पायल मंगलानी, डॉ.झोहा पठाण, डॉ.किरण गाडेकर, डॉ.पवन आरगडे, डॉ.दीपक पाठे, डॉ.अश्विन ढोले, डॉ.पी.बी.घोरपडे, डॉ.सुनील फुडके, डॉ.मेधा आदींनी रुग्णांची तपासणी केली.याप्रसंगी नागपूर येथील कॅन्सर नॅशनल इस्टिट्यूट, विदर्भ इस्टिट्यूट आॅफ सायन्स, विमस् हास्पिटल, शृष्टी नेत्र तसेच डी. डेंटल क्लिनिकचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी साईबाबा मंदिर व गणेश मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.देसाईगंज शहरातील इतर गणेश मंडळांनी रक्तदान, आरोग्य शिबिर आदींसारखे उपक्रम राबविले पाहिजे. शिवाय जनजागृतीपर कार्यक्रमही घेतले पाहिजे. यातून सामाजिक स्वास्थ्य जपले जाईल, असे आवाहन नगराध्यक्ष शालू दंडवते यांनी मार्गदर्शनातून केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.अहेरी उपविभागातही विविध गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान आदी उपक्रमासह व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य