शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

१३ हजारांवर बालकांचे शाळेत पडणार पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:30 IST

पहिल्याच दिवशी मिळणार नवीन पुस्तके : शाळा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पहिल्या वर्ग हा शिक्षणाची पहिली पायरी आहे. त्यामुळे पहिल्या वर्गाचा प्रवेश विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या पाल्याचा पहिल्या वर्गातील पहिल्या दिवसाची आठवण पालक कायमची स्मरणात ठेवतात. त्यामुळे पहिल्या वर्गातील प्रवेशाचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी जिल्ह्यातील १३ हजार ४३५ बालके पहिल्या वर्गात प्रवेश घेणार आहेत.

एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाला आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग विशेष सतर्क असते. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी त्यांच्या गावांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमधून सहा वर्षे पूर्ण होत असलेल्या बालकांची यादी घेतली. या बालकांच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे प्रवेश करून घेतले, तसेच शाळापूर्व मेळावा घेऊन पालकांना शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यामुळे शाळेबद्दल पालक व विद्यार्थी अगोदरच परिचित झाले आहेत. जुलै महिन्यापासून शाळेला सुरुवात होते. शाळेच्या पहिल्या दिवशी बालकाला गणवेश, पुस्तके मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होतो. शाळेविषयी त्याच्या मनात प्रेम निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश व पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागामार्फत केला जात आहे.

तालुकानिहाय दाखलपात्र विद्यार्थीतालुका                                     विद्यार्थीगडचिरोली                                   १.४०७आरमोरी                                      १३१५देसाईगंज                                      ८०३कुरखेडा                                       ११८२कोरची                                           ७५३धानोरा                                          १.४३४चामोर्शी                                         २,०१७मूलचेरा                                            ६६१अहेरी                                            १३१५एटापल्ली                                      १.२२१भामरागड                                         ४७३सिरोंचा                                            ८५४एकूण विद्यार्थी                             १३,४३५  

शाळापूर्व मेळाव्यांना ठिकठिकाणी प्रतिसाद• पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या बालकाला व त्याच्या पालकाला शाळेविषयी माहिती असावी, यासाठी एप्रिल महिन्यात शाळापूर्व तयारी मेळावे घेण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. • विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडींची चाचणी घेण्यात आली. पालकांना विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा अगोदरच परिचित झाली आहे. पटसंख्येसाठी शिक्षकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :SchoolशाळाGadchiroliगडचिरोली