शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दहावी हॉलतिकीट आता ऑनलाइन ; परीक्षेच्या तारखा झाल्या जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:33 IST

विद्यार्थ्यांसाठी सुविधा : २० जानेवारीपासून ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्नित सर्व माध्यमिक शाळांना दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून दिली जात आहेत. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या २० जानेवारीपासून उपलब्ध होत आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट २० जानेवारीपासून उपलब्ध होत आहेत. सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवारी, दि. २० जानेवारीपासून अॅडमिट कार्ड या लिंकद्वारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उ‌द्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

उशिरा आवेदनपत्रे भरलेल्या व एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ही एक्स्ट्रा सीट नंबर अॅडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्या मुलांचे प्रवेशपत्र गहाळ झाले तर त्या शाळांनी प्रवेश पत्राची पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ड्युप्लिकेट प्रवेशपत्र असा शेरा देऊन ते द्यावे लागणार आहे. 

डाऊनलोडसाठी शुल्क न घेण्याच्या सूचना

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होत आहेत. शाळेला हे हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. 
  • यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. हॉल तिकीटसाठी कोणत्याही शाळेने पैसे घेतल्यास तक्रार करावी.

मुख्याध्यापकांचा शिक्का घ्यावा लागणार प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंटिंग करून त्यावर मुख्याध्यापकांनी त्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करून ते मुलांना द्यावे लागणार आहेत. ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस आहे त्यांचीच प्रवेशपत्रे पेड स्टेटस अॅडमिट कार्ड या पर्यायद्वारे उपलब्ध होणार आहेत.

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. १० जानेवारीपासून मुलांना देण्यात येत आहे. बारावीची प्रवेशपत्रं www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अॅडमिट कार्ड या लिंकवरून डाऊनलोड करता येणार आहे.

२० जानेवारीपासून ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्धमुलांना शाळांकडून ऑनलाइन हॉल तिकीट २० जानेवारीपासून मिळत आहे. शाळांमार्फतीने ऑनलाइन हॉल तिकीट डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढली जात आहे. शिक्का मारून ते दिले जात आहे.

"दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट शाळास्तरावरून ऑनलाइन स्वरूपात प्रिंट काढून मिळणार आहेत." - वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, गडचिरोली.

टॅग्स :Educationशिक्षणGadchiroliगडचिरोली