शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Euro 2020 : गतविजेत्या पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात; ख्रिस्तियानो रोनाल्डोनं केला देशाचा अपमान, Video Viral 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 10:01 IST

Euro 2020 स्पर्धेतील ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोर्तुगाल संघ यांचा प्रवास उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. सर्वाधिक पाचवेळा युरोपियन स्पर्धा खेळणाऱ्या रोनाल्डो यापुढे या स्पर्धेत खेळेल याची शक्यता फार कमी आहे.

Euro 2020 स्पर्धेतील ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोर्तुगाल संघ यांचा प्रवास उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. सर्वाधिक पाचवेळा युरोपियन स्पर्धा खेळणाऱ्या रोनाल्डो यापुढे या स्पर्धेत खेळेल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळेच बेल्जियमविरुद्धचा पराभव पोर्तुगालच्या इतर सदस्यांपेक्षा रोनाल्डोच्या अधिक जिव्हारी लागला. गोल करण्याचे सातत्यानं प्रयत्न करूनही पोर्तुगालला अखेरपर्यंत ०-१ अशी पिछाडी भरून काढता आली नाही आणि बेल्जियमनं थोर्गन हझार्डनं ४३व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बेल्जियमनं गतविजेत्यांना स्पर्धेबाहेर करून Euro 2020तील सर्वात धक्कादायक निकालाची नोंद केली.   या पराभवानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो प्रचंड निराश दिसला. तो भावनिकही झालेला पाहायला मिळाला, परंतु त्याला त्याच्या भावनांवर नियंत्रण राखता आले नाही आणि त्यानं रागात स्वतःच्याच देशाचा अपमान होईल असे कृत्य केले. ड्रेसिंग रुममध्ये जात असताना रोनाल्डोनं कर्णधारासाठीचा आर्मबँड मैदानावर फेकला अन् त्यानंतर तो लाथेनं तुडवलाही. त्याच्या या कृतीची निंदा केली जात आहे. सोशल मीडियावर रोनाल्डोचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  ३६ वर्षीय रोनाल्डोनं सर्वाधिक १०९ आंतरराष्ट्रीय गोल्सच्या अली दार यांच्या विक्रमाशी बरोबरी याच स्पर्धेत केली. शिवाय युरो स्पर्धेत सर्वाधिक १२ गोल्स करणाऱ्या खेळाडूचा मानही त्यानं पटकावला. पण, आता पोर्तुगाल व रोनाल्डोचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. रोनोल्डोला फ्री किकवर गोल करण्याची संधी होती, परंतु त्याला अपयश आलं.   ''हा निकाल दुर्दैवी आहे, परंतु त्यांनी गोल केला आणि आम्ही ते करू शकलो नाही,''अशी प्रतिक्रिया पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सँटोस यांनी दिली. दरम्यान, प्रमुख खेळाडू केव्हिन डी ब्रूयने आणि इडन हझार्ड यांच्या दुखापतीनं बेल्जियमची चिंता वाढवली आहे. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोPortugalपोर्तुगाल