Video : Football fan caught cheating on his wife in viral Kiss Cam shot | Video : सामना सुरू असताना त्यानं शेजारच्या मुलीला केलं किस; त्यानंतर जे घडलं, तुम्हीच पाहा
Video : सामना सुरू असताना त्यानं शेजारच्या मुलीला केलं किस; त्यानंतर जे घडलं, तुम्हीच पाहा

कधी कधी मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या कृतीचीच अधिक चर्चा होते. असाच प्रसंग बार्सिलोना एससी आणि डेल्फिन यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्यात घडलेला पाहायला मिळाला. इक्वेडोर येथे झालेल्या या सामन्यात फुटबॉल चाहत्यानं शेजारील बसलेल्या मुलीला किस केलं... त्यानंतर जे घडलं हे पाहण्यासारखं होतं.

बार्सिलोना आणि डेल्फिन यांच्यातील सामन्याचा निकाल हा 1-0 असा डेल्फिनच्या बाजून लागला. डेल्फिनकडून सी. गार्सेस यानं 32 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णयाक ठरला. पण, या सामन्यात गार्सेसच्या गोलपेक्षा चाहत्यानं केलेल्या त्या कृतीचीच चर्चा अधिक रंगली. मैदानावर खेळ सुरू असताना या महाशयानं शेजारी बसलेल्या मुलीला किस केलं. 

त्याचा हा प्रताप कॅमेरामननं अचूक टिपला आणि स्टेडियमवरील मोठ्या स्क्रिनवर तो व्हायरल केला. आपली चोरी पकडल गेल्याचं लक्षात येताच त्यानं त्वरीत मुलीच्या खांद्यावरून हात काढला आणि त्याचा चेहरा पडला.


डेयव्ही आंड्रेडे असे या चाहत्याचे नाव आहे. हे किस प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचं ठरलेलं लग्नही मोडलं.   

पाहा व्हिडीओ...

 

Web Title: Video : Football fan caught cheating on his wife in viral Kiss Cam shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.