शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका, मेक्सिको, कॅनडा २०२६च्या फुटबॉल विश्वचषकाचे संयुक्त यजमान, फिफाचा ऐतिहासिक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 10:33 IST

FIFA World Cup 2026: २०२६ चा फिफा फुटबॉल विश्वचषक अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या आशयाची घोषणा  नुकतीच करण्यात आली. 

माॅस्को : २०२६ चा फिफा फुटबॉल विश्वचषक अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या आशयाची घोषणा  नुकतीच करण्यात आली. फिफाच्या इतिहासात संयुक्तपणे यजमानपद सोपविण्याची ही पहिलीच वेळ असेल.  पुढील आयोजनासाठी फिफाने १६ यजमान शहरांची घोषणा केली. आता ३२ ऐवजी ४८ संघांचा स्पर्धेत सहभाग असेल. २०२२ चा विश्वचषक यंदा कतारमध्ये २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येत असून, त्यात ३२ संघ सहभागी होतील.२०२६ ला ९० पैकी ६० सामन्यांचे आयोजन अमेरिकेत, तर कॅनडा आणि मेक्सिकोत प्रत्येकी १०-१० सामन्यांचे आयोजन होईल.  अमेरिकन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कार्लोस कोर्डेरियो यांनी ही अद्भूत घोषणा असल्याचे संबोधून अमेरिकन फुटबॉल विश्वासाठी हा मोठा क्षण असल्याचे सांगितले.

मोरोक्कोला अपयशमाॅस्कोतील फिफा काँग्रेसमध्ये  अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांनी २०२६ च्या यजमानपदाची संयुक्तपणे दावेदारी सादर केली. या तीन देशांनी मोरोक्कोला पराभूत केले. २०० वर राष्ट्रीय फुटबॉल महासंघांनी मतदान केले. या तीन देशांना १३४ तर मोरोक्कोला केवळ ६५ मते मिळाली. 

 सर्वात लोकप्रिय आयोजनफुटबॉल जगात लोकप्रिय खेळ असून फिफा विश्वचषकदेखील सर्वाधिक लोकप्रिय आयोजन आहे. प्रेक्षकक्षमता आणि लोकप्रियतेच्या तुलनेत फिफाचे आयोजन ऑलिम्पिकला टक्कर देते. १९३० पासून सुरू झालेली ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात लक्षवेधी ठरते. दर चार वर्षांनी हे आयोजन केले जाते.  मागच्या वेळी ही स्पर्धा फ्रान्सने जिंकली होती.  १९३० चा पहिला विश्वचषक विजेता मात्र उरुग्वे होता.

सामना स्थळेअमेरिका :  अटलांटा, बोस्टन, डलास, ह्यूस्टन, कॅन्सास, लॉस एंजिलिस, मियामी, न्यूयाॅर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, सिएटल या शहरात सामने होतील.मेक्सिको : गौडालाजारा, मेक्सिको सिटी, मॉन्टेरी. कॅनडा : टोरंटो, व्हँकूअर.

२० वर्षांपूर्वीचे आयोजनजपान-दक्षिण कोरिया यांनी २० वर्षांआधी २००२ ला  संयुक्तपणे फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले होते. माॅस्को शहरात झालेल्या फिफाच्या ६८ व्या काँग्रेसमध्ये जगातील राष्ट्रीय फुटबॉल महासंघांनी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाच्या बाजूने मतदान केले.

टॅग्स :FootballफुटबॉलUnited StatesअमेरिकाCanadaकॅनडा