सुनील छेत्री यंदाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 07:10 IST2018-07-22T22:50:26+5:302018-07-23T07:10:29+5:30
एआयएफएफ पुरस्कार : महिला गटात कमलादेवी सर्वोत्कृष्ट खेळाडू

सुनील छेत्री यंदाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू
मुंबई : भारताचा कर्णधार सुनील छेत्री याला आज २०१७ चा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार’ म्हणून निवडण्यात आले.
एआयएफएफने आज येथे झालेल्या बैठकीत त्याची निवड केली. छेत्रीने नुकताच आपला १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. बायचुंग भूतियानंतर ही कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरला. तो भारत आणि बंगळुरू एफसीचा स्ट्रायकर आहे. पुरुष गटात छेत्रीला सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर महिला गटात कमलादेवीला २०१७ ची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. युवा अनिरुद्ध थापाने चार देशांच्या इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये शानदार प्रदर्शन केले आणि सर्वांना प्रभावित केले.
एआयएफएफच्या २०१७ चे अन्य पुरस्कार याप्रमाणे:
बेस्ट ग्रासरुट डेव्हलपमेंट
प्रोग्राम पुरस्कार - केरळ एफ. ए.
सहायक रेफ्री पुरस्कार : सुमंत दत्ता आसाम, सर्वोत्कृष्ट रेफ्री पुरस्कार - सी. आर. कृष्णा