दुसरी उपांत्य लढत : इंग्लंडच्या मार्गात क्रोएशियाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 04:47 AM2018-07-11T04:47:27+5:302018-07-11T04:47:48+5:30

चमकदार कामगिरीच्या जोरावर सर्वांना चकित करणारा इंग्लंड संघ २८ वर्षांनंतर फिफा विश्वकप उपांत्य फेरीत खेळेल, त्यावेळी त्यांना भावनांवर नियंत्रण राखत ‘जायंट किलर’ क्रोएशियाचे आव्हान मोडून काढावे लागेल.

Second semi-final match: Croatia challenge on the way to England | दुसरी उपांत्य लढत : इंग्लंडच्या मार्गात क्रोएशियाचे आव्हान

दुसरी उपांत्य लढत : इंग्लंडच्या मार्गात क्रोएशियाचे आव्हान

Next

रेपिनो : चमकदार कामगिरीच्या जोरावर सर्वांना चकित करणारा इंग्लंड संघ २८ वर्षांनंतर फिफा विश्वकप उपांत्य फेरीत खेळेल, त्यावेळी त्यांना भावनांवर नियंत्रण राखत ‘जायंट किलर’ क्रोएशियाचे आव्हान मोडून काढावे लागेल.
रशियामध्ये आपल्या संघाची कामगिरी बघताना इंग्लंडमध्ये जल्लोष सुरू आहे. प्रशिक्षक साऊथगेटच्या संघाने देशवासीयांच्या हृदयात स्थान मिळवले आहे, पण प्रशिक्षकांनी खेळाडूंना आपले पाय जमिनीवरच ठेवण्याची ताकीद दिली आहे. इंग्लंड यापूर्वी फिफा विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीत १९६६ आणि १९९० मध्ये खेळला होता आणि एकमेव विश्वविजेतेपद १९६६ मध्ये पटकावले होते. मिडफिल्डर डेले अली म्हणाला,‘आम्ही येथे आपल्या तयारीत व्यस्त आहोत. सोशल मीडिया किंवा इंटरनेट बघितल्यानंतर ही मोठी उपलब्धी असल्याची कल्पना येते. आमचे लक्ष उपांत्य फेरीच्या लढतीवर केंद्रित झाले असून त्यासाठी यापूर्वीची कामगिरी विसरावी लागेल.’
इंग्लंडने स्वीडनचा २-० ने पराभव करीत अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. त्यात पहिला गोल अलीने नोंदवला होता. आता त्यांची लढत क्रोएशिया संघासोबत आहे. क्रोएशियाने जेतेपदाचा प्रबळ दावेदार अर्जेंटिना संघाचा साखळी फेरीत पराभव केला होता. क्रोएशिया संघात रियाल माद्रिदचा लुका मोडरिच व बार्सिलोनाचा इव्हान रेकिटिच यांच्यासारखे खेळाडू आहेत.
अली म्हणाला, ‘संघाला सुरुवातीपासून चांगल्या कामगिरीवर विश्वास होता. आमच्या संघात प्रतिभावान खेळाडू आहेत. काही दिग्गज खेळाडू व शानदार व्यवस्थापक आहे.’ दुसऱ्या बाजूचा विचार करता क्रोएशिया संघ या महत्त्वाच्या लढतीपूर्वी वादाच्या भोवºयात सापडला आहे. रशियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटनंतर माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू ओगजेन वुकोजेविचने युक्रेनला पाठिंबा देणारी व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे. त्यानंतर त्याला पथकातून बाहेर करीत दंड ठोठावण्यात आला आहे. फिफाच्या नियमांनुसार राजकीय वक्तव्यावर बंदी आहे.
वादानंतरही क्रोएशियाने गेल्या २० वर्षांमधील विश्वकप स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. डालिच म्हणाले,‘आम्ही इंग्लंडच्या विश्वकप जिंकण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरू, असा आम्हाला विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)

क्रोएशियाची भिस्त फॉर्मात असलेल्या मॉडरिचवर

विश्वकप स्पर्धेत क्रोएशियाला मिळालेल्या यशाचा सूत्रधार कर्णधार लुका मॉडरिचवर बुधवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाºया उपांत्य लढतीत लय कायम राखत संघाला जेतेपदाच्या आणखी एक पाऊल जवळ नेण्याची जबाबदारी राहणार आहे.

क्रोएशियाला आतापर्यंत मिळालेल्या पाच विजयांपैकी तीनमध्ये ‘मॅन आॅफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मॉडरिचवर अपेक्षांचे ओझे आहे. अर्जेंटिनाविरुद्ध साखळी
फेरीत मिळवलेल्या विजयात दोन गोल नोंदवणाºया मॉडरिचने डेन्मार्क व रशियाविरुद्ध शूटआऊटमध्येही गोल नोंदवले होते.

स्ट्रायकर मारियो मेंडजुकिच म्हणाला,‘मी लुकाला फार पूर्वीपासून ओळखतो. आम्ही क्लबमध्येही एकत्र खेळलो आहोत. तो या प्रेमाचा हकदार आहे. त्याने बरीच मेहनत घेतली असून तो सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरावा, असे मला वाटते.’ ४० लाख लोकसंख्या असलेल्या देशासाठी फिफा विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणे मोठी उपलब्धी आहे.

मॉडरिच भुतकाळातील कडव्या आठवणी विसरण्यासाठी फुटबॉलच्या या महासंग्रामात सहभागी झाला. त्याला यूरो २००८ क्वार्टर फायनलमध्ये तुर्कीविरुद्ध शूटआऊटमध्ये पेनल्टीवर गोल नोंदवता आला नव्हता. मॉडरिच म्हणाला,‘आम्ही भुतकाळातील कटूस्मृती विसरण्यास प्रयत्नशील असून सर्व ऋण फेडत आहोत.’

Web Title: Second semi-final match: Croatia challenge on the way to England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.