शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

रोनाल्डोचा विक्रमी धडाका; पोर्तुगालचा हंगेरीला ३-० ने धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 05:51 IST

युरो चषक फुटबॉल रोनाल्डोची जादू दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये पाहण्यास मिळाली. त्याने ८७ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवर पहिला वैयक्तिक गोल केल्यानंतर इन्ज्युरी टाइमध्ये दुसरा गोल करत पोर्तुगालच्या विजयावर शिक्का मारला.

बुडापेस्ट : स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपला जलवा दाखवताना हंगेरीच्या आव्हानातील हवा काढली. त्याने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर गतविजेत्या पोर्तुगालने विजयी सलामी देताना हंगेरीचा ३-० असा धुव्वा उडवला. या शानदार कामगिरीसह रोनाल्डो युरो चषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.

रोनाल्डोची जादू दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये पाहण्यास मिळाली. त्याने ८७ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवर पहिला वैयक्तिक गोल केल्यानंतर इन्ज्युरी टाइमध्ये दुसरा गोल करत पोर्तुगालच्या विजयावर शिक्का मारला. त्याआधी ८४ व्या मिनिटालाच बचावपटू राफेल गुरेइरो याने गोल करत पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली होती. केवळ पाच मिनिटांमध्ये तीन गोलचा धडाका करत पोर्तुगालने दिमाखदार विजय मिळवला.

२००४ साली पहिल्यांदा युरो चषक स्पर्धेत खेळलेला रोनाल्डो विक्रमी पाचव्यांदा या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या सामन्याआधी दिग्गज फुटबॉलपटू मायकल प्लॅटिनी यांच्या स्पर्धेतील सर्वाधिक नऊ गोलची त्याने बरोबरी केली होती. मात्र, हंगेरीविरुद्ध दोन गोल करत रोनाल्डोने आपल्या गोलची संधी ११ अशी करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे, सलग पाच युरो चषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे.

स्वयंगोल आणि जर्मनी पराभूतn म्युनिख : युरो चषक स्पर्धेत जर्मनीला बलाढ्य फ्रान्सकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करणाऱ्या मॅट्स हमेल्स याच्याकडून झालेली चूक जर्मनीच्या पराभवास कारणीभूत ठरली. हमेल्सकडून झालेला स्वयंगोल सामन्यातील एकमेव गोल ठरला आणि या जोरावर फ्रान्सने १-० अशी बाजी मारली.n अनुभवी बचावपटू हमेल्सला प्रशिक्षक जोकिम लूव यांनी अंतिम संघात स्थान दिले, मात्र त्याचे पुनरागमन सुखद ठरले नाही. २० व्या मिनिटाला लुकास हर्नांडेजने केलेल्या क्रॉसवर चेंडू फॉरवर्ड काएलिन एमबाप्पे याच्याकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न हमेल्सने केला. मात्र या प्रयत्नात चुकून चेंडू जर्मनीच्याच गोलजाळ्यात गेल्याने फ्रान्सला आयतीच आघाडी मिळाली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखत फ्रान्सने बाजी मारली.n सामन्यानंतर प्रशिक्षक लूव म्हणाले की, ‘पराभवासाठी मी हमेल्सला दोष देणार नाही. आमचे नशीब खराब होते. चेंडू वेगात होता आणि त्याला बाहेर करणे कठीण होते.’ दोन्ही संघांनी खास करून फ्रान्सने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. यापैकी फ्रान्सचे दोन गोल ऑफसाइड निर्णय दिल्याने अवैध ठरले.

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो