नवी दिल्ली : ख्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉलचा दिग्गज स्टार. पदलालित्याचा चमत्कार घडविणारा खेळाडू. आलिशान आयुष्य जगणारा पोर्तुगालचा गर्भश्रीमंत माणूस. मैदान आणि मैदानाबाहेर त्याची चर्चा होते. आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा धनी असलेल्या रोनाल्डोचे ‘फॅन फॉलोर्इंग’ फार मोठे आहे.२००२ ला रोनाल्डोने व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याच्या लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत आहे. विशेषत: जगभरातील मुलींना त्याच्या खेळाची आणि व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडली. फुटबॉल मैदानावर ११ खेळाडू असतात, मात्र रोनाल्डोच्या गर्लफ्रेण्डची यादी याहून मोठी आहे. त्यात बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिचादेखील समावेश आहे.२००३ ला मॅन्चेस्टर युनायटेडचा करार मिळताच रोनाल्डो मुलींसाठी आवडता खेळाडू बनला. येथूनच देशविदेशातील त्याच्या गर्लफ्रेण्डची यादी बनायला सुरुवात झाली. ब्राझीलची मॉडेल योर्डाना जॉर्डेल ही त्याची पहिली गर्लफ्रेण्ड बनली. यानंतर मॉडेल आणि टीव्ही अँकर मार्शी रोममेरो, ब्रिटनची जेम्मा एटिकसन या सुंदर मुलींसोबत त्याचे नाते जडले. मात्र यातील बऱ्याच संबंधांचा लवकरच काडीमोडदेखील झाला. २०१० ला रोनाल्डो आणि रशियाची मॉडेल यांच्यातील रिलेशनशिपच्या बातम्या चांगल्याच गाजल्या. दोघे ५ वर्षे सोबत होते. जानेवारी २०१५ ला इरिना रोनाल्डोपासून विभक्त झाली. त्याचवर्षी रोनाल्डो स्पेनची टीव्ही पत्रकार लुसिया विलालोन हिच्या संपर्कात आला. दोघे काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर वेगळे झाले. तेव्हापासून तो स्पेनची मॉडेल जॉर्जिया रर्ॉड्रिग्ज हिच्यासोबत अद्याप रिलेशनशिपमध्ये आहे. (वृत्तसंस्था)>बिपाशासोबतही जडले नाते२००७ ला बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूचे रोनाल्डोसोबतचा ‘लिपलॉक’ चर्चेचा विषय ठरला होता. बिपाशा त्यावेळी जॉन अब्राहम याच्यासोबत डेट करीत होती. अशावेळी रोनाल्डोसोबतच्या जवळिकीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. बिपाशाने मात्र रोनाल्डो हा केवळ चांगला मित्र असल्याचे वारंवार सांगितले होते.
रोनाल्डोच्या ‘गर्लफ्रेंड’ची यादी फुटबॉलपेक्षा मोठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:11 IST