माद्रिद - रिअल माद्रिदने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ स्पर्धेत गेटाफे एफसीचा ३-१ ने पराभव केला. या सामन्यात हिरो ठरला तो स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो. त्याने शानदार दोन गोल नोंदवले. गेरेथ बेलने एक गोल केला. पॅरिस सेंट जर्मनविरुद्ध चॅम्पियन्स लीगच्या अंतिम १६ च्या सामन्यापूर्वीचा हा विजय महत्त्वपूर्ण आहे.ला लीगा स्पर्धेत सर्वांत कमी सामन्यात ३०० गोल नोंदवणारा रोनाल्डो पहिला खेळाडू बनला आहे. त्याच्या नावे २८६ सामन्यांत ३०१ गोल झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या पाच सामन्यांत त्याने १० गोल नोंदवले आहेत. आता मंगळवारी माद्रिदचा सामना पीएसजीविरुद्ध होणार आहे. त्यांनी पहिल्या फेरीत पीएसजीचा ३-१ने पराभव केला होता. त्यामुळे पीएसजी संघापुढे आव्हान असेल. संघाचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान म्हणाले की, मंगळवारी होणाºया सामन्यापूर्वी विजय महत्त्वाचा होता. आता चांगल्या मूडमध्ये राहण्यासाठी आमच्याकडे तीन दिवस आहेत.
माद्रिदच्या विजयात रोनाल्डोची चमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:53 IST