शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रोनाल्डो ‘हिरो’ की ‘अ‍ॅन्टीहिरो’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:19 AM

अभिनयसम्राट ख्रिस्तियानो रोनाल्डो युरोविजेते पोर्तुगाल आणि माजी जगज्जते स्पेन यांच्यातील बऱ्यापैकी रंगलेल्या लढतीमध्ये त्याच्या तमाम चाहत्यांसाठी ‘हिरो’ ठरला.

- रणजित दळवीअभिनयसम्राट ख्रिस्तियानो रोनाल्डो युरोविजेते पोर्तुगाल आणि माजी जगज्जते स्पेन यांच्यातील बऱ्यापैकी रंगलेल्या लढतीमध्ये त्याच्या तमाम चाहत्यांसाठी ‘हिरो’ ठरला! त्याने शानदार ‘हॅट्ट्रिक’ केली. त्याच्या कौशल्याबाबत कोणाच्याच मनात शंका नाही. तो श्रेष्ठ की मेस्सी? हा प्रश्न सदोदित विचारला जाईल व त्याचे निर्णायक उत्तर मिळणे कठीणच जावे. मात्र, रोनाल्डोच्या खिलाडू वृत्तीविषयी शंका घ्यायला बराच वाव आहे. कालचीच गोष्ट घ्या. त्याने ज्या प्रकारे जी फ्री-किक मिळविली, ती त्याच्या अखिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करून गेली. त्याने ज्या प्रकारे त्याचा प्रतिस्पर्धी बचावपटू पिके याने मागून ढकलल्याचे सिद्ध करताना जे नाटक केले ते अप्रतिम वठले. आपल्याला पिकेने ढकलले, हे रेफरी गिअ‍ॅनलुची रॉकी यांच्या मनावर ठसविण्यात तो यशस्वी झाला. बिचारे विश्वचषकातील आपल्या पदार्पणाच्या लढतीतच एका महत्त्वाच्या क्षणी चुकीच्या निर्णयाचे धनी झाले. एवढी मोठी लढत. त्यात ही चूक! ‘पोस्ट मॅच अ‍ॅनॅलिसीस’दरम्यान व्हिडीओ रिप्ले पाहिल्यानंतर त्यांच्या ती लक्षात आली नाही, तरी निदर्शनास आणून दिली जाईल.त्या फ्री किकवरचा रोनाल्डोचा गोल अप्रतिम, ‘हाय-क्लास’! एकदा वाटले, की बचावात्मक भिंत चुकीच्या पद्धतीने उभारली गेली; पण नाही, रोनाल्डोने एखाद्या सराइताने गाडी वळवावी तसा चेंंडू त्याभोवती वळविला.इंग्लिश साखळीच नव्हे, तर सध्या जगातला अव्वल गोलरक्षक असणारा डे ही चक्क जमिनीला खिळून राहिला. मोहनी घातल्यासारखा! बरे रोनाल्डोने चेंडू वळविला तेथे स्पेनचे पिके आणि बुस्केटस हे दोन्ही उंच बचावपटू उभे होते. सलाम रोनाल्डो! पण, त्या अखिलाडू कृत्यासाठी तुझा धिक्कार! नाही शोभत जगातील अव्वल खेळाडूला! पुढच्या पिढीसमोर हा आदर्श?बाकी खेळाविषयी म्हणायचे, तर स्पेन प्रशिक्षकांच्या हकालपट्टीनंतर सावरतो आहे, ही त्याच्या चाहत्यांसाठी सुचिन्हे. डिएगो कॉस्टाचे दोन्ही गोल अप्रतिम. पहिला गोल करताना त्याच्यासमोर होते किमान चार प्रतिस्पर्धी आणि गोलरक्षक. पण त्यांना दिलेली हुलकावणी? बघत राहावी, पुन:पुन्हा. स्पेनचा दुसरा गोल हा ‘सेट-पीस’चा एक छान नमुना. इनिएस्टोने चेंडू अचूक ‘चिप’ केला. बुस्केटसचा अप्रतिम क्रॉस हेडर आणि मोक्याच्या ठिकाणी हजर डिएगो! केवढा सुनियोजितपणा?पोर्तुगालचे अन्य दोन गोल हे ‘गिफ्ट’ होते. नाचोने रोनाल्डोला पाडले. परिणाम, पेनल्टी! रोनाल्डो थोडीच अशी संधी सोडतो? डे ही याने रोनाल्डोचा त्यानंतरचा फटका एवढ्या गलथानपणे गोलमध्ये जाऊ द्यावा? आमचा सोडा, त्याचाच विश्वास बसणार नाही. मात्र, नाचोने वीसएक यार्डांवरून ‘आऊटस्टेप’ने मारलेली व्हॉली म्हणजे स्वप्नवत! फार क्वचित असा मोका मिळतो. आधीच्या चुकीची भरपाई ही अशाने केली.एक बरे झाले, की ही लढत अनिर्णीत राहिली. कारण, स्पर्धेत पुढे पुन्हा यांची गाठ पडणार, हे निश्चित. तेव्हाही रोनाल्डो विरुद्ध स्पेन असाच मामला असेल. मात्र, त्या वेळीस्पेनला सूर गवसलेला असेल. डे ही हादेखील सावरलेला असेल. त्याचे तसे होणे महत्त्वाचे आहे. कारण, या मोहिमेतला तो अत्यंत महत्त्वाचा मोहरा आहे.हा आठवडा मोरोक्कोसाठी खराब गेला. विश्वचषक आयोजनाचे स्वप्न भंगले व इराणविरुद्धच्या पराभवाने या स्पर्धेतली गच्छंतीही जवळपास निश्चित झाली. बिचारा अझीज बौहादूझ, दोन मिनिटांसाठी जखमी आम्रबातसाठी मैदानावर आला व संघावरचे संकट दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाअंती ‘खलनायक’ ठरला! ‘अ‍ॅडेड टाइम’मध्ये असणारा दबाव किती असतो, हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशिया