शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

FIFA World Cup 2022: ३० लाख लोकसंख्येचा कतार फिफा विश्वचषकासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 06:31 IST

FIFA World Cup 2022: जपान आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त यजमानपदाखाली २००२ ला आशियात फिफा फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन झाले.

- अभिजित देशमुख दोहा : जपान आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त यजमानपदाखाली २००२ ला आशियात फिफा फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन झाले. त्यानंतर कतार हा ३० लाख लोकसंख्येचा आशियातील दुसरा देश स्वबळावर इतके मोठे आयोजन करू शकेल, असा कुणी विचार केला नसावा. फिफा आयोजनाच्या इतिहासात आयोजन करणारा हा सर्वांत लहान देश ठरला आहे.

विश्वचषकाचे आयोजन ही या  देशासाठी आकर्षणाची आणि गर्वाची बाब ठरावी. वाळवंटातील हा देश मोत्यांचा शोध घेत-घेत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा पाइपलाइनद्वारे गॅस पुरविणारा देश बनला. पैशाचा उपयोग जागतिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी कसा केला जातो, हे पाहणे फारच प्रेरणास्पद आहे. आयोजनाच्या मार्गात अनेक अडथळे आलेत; पण कतार विचलित झाला नाही.

जगाचे लक्ष आता कतारकडे लागले. आपण हे आयोजन यशस्वी केल्यास जगावर  महत्त्वपूर्ण प्रभाव पडेल याची आयोजकांना जाणीव आहे. यजमानपद मिळवण्यासाठी कतारने १६० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केल्याचे समजते. फुटबॉल स्टेडियम, पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, प्रेक्षक व्यवस्था  आणि इतर अनेक महत्त्वाच्या व्यवस्था विलक्षण दिसतात. विश्वचषक सुरू होण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना, देश फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

गर्मीचा धोका कायम...हे आयोजन मुळात जून- जुलैमध्ये होणार होते, पण कतारमध्ये  नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या थंड महिन्यांत झाले, तरीही येथे उष्ण वातावरण कायम आहे. सकाळी दहा वाजेपासून ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गरमी असते.  अतिउष्णतेमुळे खेळाडूंच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यांना अधिक कठोर परिश्रम  होऊ शकतात, विश्वचषकादरम्यान ही परिस्थिती कायम राहिल्यास प्रशिक्षकांना त्यांच्या संघांच्या खेळण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल.

खेळ आयोजनाचा मोठा इतिहासकतारची राजधानी दोहा येथे आशियाई क्रीडा स्पर्धेचे २००६ ला आयोजन झाले. २०१० ला अशक्य वाटणारी फिफाची बोली जिंकण्याआधी या देशाने  दोहा ओपन, एटीपी २५० आयोजित केली. २०२१ ला फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे आयोजन झाले. त्याआधी २०१९ ला  विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. पुढच्यावर्षी येथे पुरुष गटाची एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धा होईल.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Footballफुटबॉल