नेमारला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 04:45 IST2018-05-15T04:45:30+5:302018-05-15T04:45:30+5:30

पॅरिस सेंट जर्मनचा स्टार फुटबॉलपटू नेमार याची फ्रान्सचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. दुखापतीमुळे त्याला तीन महिने संघाबाहेर राहावे लागले.

Neymar best player award | नेमारला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

नेमारला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

पॅरिस : पॅरिस सेंट जर्मनचा स्टार फुटबॉलपटू नेमार याची फ्रान्सचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. दुखापतीमुळे त्याला तीन महिने संघाबाहेर राहावे लागले.
जगातील सर्वात महागडा खेळाडू असणाऱ्या नेमारने पीएसजीसाठी २० लीग सामन्यात १९ गोल केले आहेत. त्याला फेब्रुवारीमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानाबाहेर राहिला आणि या महिन्याच्या सुरुवातीलाच तो परतला आहे. तो एका हंगामानंतर क्लब सोडू शकतो, अशी चर्चा होती; परंतु या चर्चेला त्याने स्वत: पूर्णविराम दिला.
नेमार म्हणाला, ‘‘मी या हंगामातील कामगिरीवर खूप खुश आहे. ही सन्मानाची बाब आहे. आपल्या सहकारी खेळाडूंशिवाय मीही पुरस्कार मिळवू शकलो नसतो. जेव्हा कधी ट्रान्सफर विंडो येते तेव्हा अशी चर्चा होते. मी याविषयी मत व्यक्त करू इच्छित नाही.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Neymar best player award