पाकिस्तानविरुद्धचा सामना अन्य लढतींप्रमाणेच - कॉन्स्टेनटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:31 IST2018-09-11T00:31:10+5:302018-09-11T00:31:14+5:30

भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कान्स्टेनटाईन यांनी सॅफ चषकाच्या उपांत्य फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकविरुद्धचा सामनादेखील ‘अन्य लढतीप्रमाणेच’ असेल असे सांगितले.

The match against Pakistan - like other matches - Constantine | पाकिस्तानविरुद्धचा सामना अन्य लढतींप्रमाणेच - कॉन्स्टेनटाईन

पाकिस्तानविरुद्धचा सामना अन्य लढतींप्रमाणेच - कॉन्स्टेनटाईन

ढाका : भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कान्स्टेनटाईन यांनी सॅफ चषकाच्या उपांत्य फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकविरुद्धचा सामनादेखील ‘अन्य लढतीप्रमाणेच’ असेल असे सांगितले.
भारताने सलग दोन सामन्यांत श्रीलंका व मालदीव या संघावर विजय नोंदवत उपांत्य फेरी गाठली. बुधवारी भारताचा सामना वंगबंधू राष्ट्रीय स्टेडियममध्ये पाकिस्तानशी होणार आहे. कान्स्टेनटाईन म्हणाले की, ‘पाकिस्तानविरुद्धचा सामना काही वेगळा नाही. तो अन्य लढतींप्रमाणेच आहे. या बाबीचा आम्ही आमच्यावर दबाव येऊ देत नाही आणि आम्ही त्यांना नमवून फायनलमधील स्थान निश्चित करू, अशी आम्हाला आशा आहे.’

Web Title: The match against Pakistan - like other matches - Constantine