लियोनल मेस्सीने नोंदवला ६ हजारावा विक्रमी गोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 05:41 IST2018-08-20T05:40:53+5:302018-08-20T05:41:25+5:30

लियोनल मेस्सी याने आज बार्सिलोनासाठी स्पेनिश लीगमध्ये ६ हजारावा गोल नोंदवला.

Lionel Messi recorded 6 Hajarao record goals | लियोनल मेस्सीने नोंदवला ६ हजारावा विक्रमी गोल

लियोनल मेस्सीने नोंदवला ६ हजारावा विक्रमी गोल

माद्रिद : लियोनल मेस्सी याने आज बार्सिलोनासाठी स्पेनिश लीगमध्ये ६ हजारावा गोल नोंदवला. ज्यामुळे संघाच्या विजेतेपद बचाव मोहिमेची सुरुवात विजयाने झाली.
मेस्सीने काल कॅम्प नाऊमध्ये बार्सिलोनाच्या अलावेसवर ३-0 विजयादरम्यान ६४ व्या मिनिटाला फ्री किकवर संघाकडून पहिला गोल केला. त्याने इंज्युरी टाईमच्या दुसऱ्याच मिनिटाला संघाकडून तिसरा गोलदेखील केला. दरम्यान, स्थानापन्न खेळाडू फिलीप कोटिन्हो याने ८३ व्या मिनिटाला बार्सिलोनाकडून दुसरा गोल केला.
मेस्सीने २00९ मध्ये बार्सिलोनाचा ५ हजारावा गोलदेखील नोंदवला होता.

Web Title: Lionel Messi recorded 6 Hajarao record goals