फुटबॉलला द्या प्रोत्साहन : कर्णधार विराट कोहली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 05:43 IST2018-06-04T05:43:07+5:302018-06-04T05:43:07+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय फुटबॉल संघाचे सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर येण्याचे आवाहन केले.

 Let's encourage football: Captain Virat Kohli | फुटबॉलला द्या प्रोत्साहन : कर्णधार विराट कोहली

फुटबॉलला द्या प्रोत्साहन : कर्णधार विराट कोहली

दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय फुटबॉल संघाचे सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर येण्याचे आवाहन केले.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने प्रेक्षकांना फुटबॉल सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला पाठिंबा देत प्रेक्षकांना विराट कोहलीनेही विनंती केली आहे. भारतीय संघ फिफा रॅँकिंगमध्ये ९७ व्या स्थानी आहे. भारतीय कर्णधार छेत्रीने आंतरराष्टÑीय कारकिर्दीत तीनवेळा हॅट्ट्रिक केली.

कोहली म्हणतो, ‘ सुनील माझा चांगला मित्र आहे. आपण सर्वांनी फुटबॉल संघाने घेतलेल्या कष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर यायला हवे. सर्वच खेळांवर प्रेम करणारा देश म्हणून भारताचे नाव जगभर व्हायला हवे़’

Web Title:  Let's encourage football: Captain Virat Kohli