शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निकटवर्तीयाची हत्या; हॉटेल रूममध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 1:45 PM

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर सोमवारी दुःखाचा डोंगर कोसळला आहे

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डोवर सोमवारी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. युव्हेंटस क्लबकडून इटालियन लीगमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रोनाल्डोला हा मोठा धक्काच होता. रोनाल्डोचा हेअरड्रेसर रिकार्डो मार्क्यू फेरेरा असे या व्यक्तीचे नाव आहे आणि स्वित्झर्लंडच्या एका हॉटेलमध्ये त्याचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 39 वर्षीय इसमाला अटक केली आहे. 

फेरेराच्या शरीरावर चाकूचे वार केले होते. फेरेरा राहत असलेल्या रूममध्ये भांडणाचा आवाज येत असल्यानं शेजारच्यांनी रिसेप्शनकडे तक्रार केली होती. पण, त्यांच्याकडून तातडीनं पाऊल उचललं गेलं नाही.  काही वेळानंतर साफसफाई करण्यासाठी कर्मचारी रूममध्ये आल्यानंतर फेरेराचा मृतदेह त्याला दिसला आणि त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले. रोनाल्डोसोबत गेली अनेक वर्ष फेरेरा काम करत आहे, परंतु अजूनही रोनाल्डोनं याबाबत कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही.  

रोनाल्डोने नोंदवला विक्रमी ७०० वा गोल

पॅरिस : युक्रेनने पोर्तुगालचा पराभव करीत युरो २०२० साठी पात्रता मिळविली. या लढतीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीतील ७०० वा गोल नोंदवला.

सोफियामध्ये दुसऱ्या लढतीत इंग्लंडने बुल्गारियाचा पराभव केला. पण यजमान चाहत्यांनी इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली. युक्रेनपूर्वी पोलंड, रशिया, इटली आणि बेल्जियम या संघांनीही १२ जूनपासून प्रारंभ होत असलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. ‘अ’ गटातील अव्वल संघ इंग्लंडला सध्या प्रतीक्षा करावी लागणार आहे. बल्गेरियाला ६-० ने पराभूत केल्यानंतरही त्यांना पात्रता मिळविता आलेली नाही. या लढतीत स्थानिक चाहत्यांनी दोनदा वर्णद्वेषी नारेबाजी केली. त्यामुळे सामना थांबवावा लागला. इंग्लंड फुटबॉल संघटनेने फिफाला या प्रकरणात चौकशी करण्याची सूचना केली आहे.

दरम्यान, फ्रान्स व तुर्की यांच्यादरम्यान सुरू असलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर खेळल्या गेलेली लढत अनिर्णीत संपली. फ्रान्सने सिरियामध्ये सैनिक कारवाईसाठी तुर्कीवर टीका केली आहे. फ्रान्सला पुढील महिन्यात मोलदोवाचा पराभव करीत पात्रता मिळविण्याची संधी आहे. दुसºया बाजूचा विचार करता, तुर्कीने आईसलँड विरुद्धची लढत बरोबरीत सोडविली तरी त्यांना पात्रता मिळविता येईल. (वृत्तसंस्था)

रोनाल्डो गोलकरण्यात ‘उजवा’च!रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीतील एकूण गोलपैकी ४४४ म्हणजेच ६३% गोल उजव्या पायाने केले आहेत. तसेच १२६ गोल डाव्या पायाने, १२८ गोल हेडरद्वारे नोंदवले आहेत. याशिवाय त्याने दोन गोल छातीच्या सहाय्यानेही केले आहेत.रेयाल माद्रिदसाठीसर्वाधिक गोलआपल्या १७ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोर्तुगालकडून खेळताना ९५ गोल केले आहेत. याशिवाय विविध आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्लब संघाकडून खेळताना त्याने ६०५ गोल केले आहेत. यामध्ये रोनाल्डोने रेयाल माद्रिद क्लबसाठी सर्वाधिक ४५० गोल नोंदवले असून मँचेस्टर युनायटेडसाठी ११८, युवेंट्ससाठी ३२ आणि स्पोर्टिंग क्लब पोर्तुगालसाठी ५ गोल केले आहेत.७०० गोल करणारे फुटबॉलपटू१. जोसेफ बायकन 805(झेक प्रजासत्ताक)२. रोमारियो (ब्राझील) 772३. पेले (ब्राझील) 767४. फेरेंक पुस्कास (हंगेरी) 746५. गर्ड म्यूलर (जर्मनी) 735६. ख्रिस्तियानो रोनाल्डो700 (पोर्तुगाल)

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलCrime Newsगुन्हेगारी