शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

फिफा विश्वचषकातही ‘जय महाराष्ट्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:15 IST

यात ४० हजार अर्जेंटिनाचे आणि ३५ हजार ब्राझिलियन खेळाडू सहभागी होतील. स्पेन, इंग्लंड, आणि मेक्सिकोचे चाहतेही मोठ्या प्रमाणात पोहोचतील.

अभिजित देशमुख -दोहा :  फिफा विश्वचषकात सहभागी झालेले ३२ संघ कतारमध्ये पोहोचले आहेत. कॅमेरुन, पोर्तुगाल, सर्बिया, उरुग्वे आणि ब्राझीलसह पाच संघ हे सर्वात शेवटी पोहोचले. विमानतळावर हजारो फुटबॉलप्रेमींनी ब्राझीलच्या फुटबॉलपटूंचे स्वागत केले. ३२ संघांचे प्रशिक्षण स्थळ आणि हॉटेल हे फक्त १० किमीच्या परिसरात आहे. कतार विद्यापीठ हे सर्वात आवडीचे सरावाचे ठिकाण आहे. फिफा विश्वचषकाचा आनंद घेण्यासाठी जगातील दहा लाखांपेक्षा जास्त फुटबॉलप्रेमी येण्याची आशा आहे. 

यात ४० हजार अर्जेंटिनाचे आणि ३५ हजार ब्राझिलियन खेळाडू सहभागी होतील. स्पेन, इंग्लंड, आणि मेक्सिकोचे चाहतेही मोठ्या प्रमाणात पोहोचतील.  कतारमध्ये जवळपास आठ लाख भारतीय आहेत. त्यात उत्तर भारतीय आहेत. आणि जवळपास दोन हजार मराठी आहेत. त्यात विश्वचषक कर्मचारी, ठेकेदार आणि स्वयंसेवकदेखील आहेत. औरंगाबादच्या आयटी इंजिनिअर दीप्ती जोशी - कुलकर्णी या स्वयंसेवक म्हणून निवडल्या गेल्या आहेत. त्यात १२ स्वयंसेवकांच्या प्रभारी आहेत. त्या फिफा फॅन फेस्टिव्हलसाठी काम करतील. फेस्टिव्हल दरम्यान संघाच्या सहकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याबरोबरच प्रेक्षकांना सहकार्य करण्याचे काम दीप्ती करणार आहेत. त्या सांगतात की, रोज जवळपास ३५ हजार फुटबॉलप्रेमी पोहोचतील. आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहोत.’

फिफा फॅन फेस्टिव्हल विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी सर्वात चांगली जागा आहे. आणि येथील वातावरण खूपच रोमांचक आहे. दीप्ती यांनी सांगितले की, कतारला जेव्हा २०२२ च्या विश्वचषकासाठी यजमान म्हणून निवडले गेले. तेव्हा आम्ही तेथेच होतो. मी आणि माझे पती तेव्हापासूनच काम करत आहोत. आम्ही जवळपास दहा वर्षांपासून येथे राहत आहोत. आणि आता कतारला काहीतरी परत करण्याची वेळ आली आहे. आणि फिफा विश्वचषक हे सर्वोत्तम माध्यम आहे.’

दीप्ती यांचे पती प्रसाद कुलकर्णी हे सर्वात मोठ्या एलएनजी उत्पादकांपैकी एकात सेवारत आहेत. कतरच्या मराठी समुदायात नागपूरच्या कौस्तुभ कोठीवान यांचाही समावेश होतो. ते टर्नस्टाइलचे व्यवस्थापन करणाऱ्या पथकाचे प्रभारी आहेत. याच प्रवेशद्वारातून सर्व तिकीटधारक स्टेडियममध्ये प्रवेश करू शकतील. अमित कर्वे आणि शंतनू देशपांडे हे कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत आणि पुण्याच्या एचआर प्रोफेशनल आसावरी देशपांडे या देखील फॅन फेस्टिव्हलमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Maharashtraमहाराष्ट्रFootballफुटबॉल