शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:10 IST

Israel-Hamas war: जवळपास दोन वर्षे होत आली तरी इस्राइलने गाझामध्ये सुरू असलेले हल्ले अद्याप थांबवलेले नाही. दरम्यान, इस्राइलने गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात  पॅलेस्टाईनच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार असलेल्या सुलेमान अहमद जैद अल-ओबैद याचा मृत्यू झाला आहे.

जवळपास दोन वर्षे होत आली तरी इस्राइलने गाझामध्ये सुरू असलेले हल्ले अद्याप थांबवलेले नाही. दरम्यान, इस्राइलने गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात  पॅलेस्टाईनच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार असलेल्या सुलेमान अहमद जैद अल-ओबैद याचा मृत्यू झाला आहे. तो ४१ वर्षांचा होता. दक्षिण गाझामध्ये मिळणाऱ्या मदतीची वाट पाहत असतान सुलेमान अहमद जैद अल-ओबैद याचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टाइन फुटबॉल संघटनेने दिली आहे.

सुलेमान अल ओबेद याला पॅलेस्टाइनचा पेले म्हणून ओळख होती. पॅलेस्टाइन फुटबॉल संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गाझामधील खादमत अल शाती क्लबचा माजी स्टार फुटबॉलपटू असलेल्या सुलेमान अल ओबेद याने पॅलेस्टाइनसाठी २४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. तसेस फूटबॉलच्या संपूर्ण कारकिर्दीत १०० हून अधिक गोल केले होते. त्यामुळे तो पॅलेस्टाइनमधील सर्वात चर्चित खेळाडूंपैकी एक बनला होता.

सुलेमान अल ओबेद ६ ऑगस्ट रोजी दक्षिण गाझापट्टीमध्ये स्थानिकांना मिळणाऱ्या मदतीसाठीच्या रांगेत उभा होता. त्याचवेळी इस्राइलने तिथे हल्ला केला. त्यात तो मारला गेला.  दरम्यान, हमासने २०२३ साली ऑक्टोबर महिन्यात केलेल्या हल्ल्यानंतर इस्राइलने गाझा पट्टीमध्ये जोरदार प्रतिहल्ले चढवण्यास सुरुवात केली होती. आता जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये काही खेळाडूंचाही समावेश आहे.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षFootballफुटबॉलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध