शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कौतुक तर करावंच लागेल; भारतीय संघाने अंध फुटबॉलपटूंना केली आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 10:39 AM

आशियाई चषक स्पर्धेत 55  वर्षांनी विजयाचा झेंडा फडकवणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचे कौतुक करावं तितकं कमी...

ठळक मुद्देभारताने 55 वर्षांनी आशियाई स्पर्धेत विजय मिळवलासलामीच्या लढतीत भारताचा 4-1ने थायलंडवर विजयगुरुवारी होणाऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीशी मुकाबला

अबुधाबी : आशियाई चषक स्पर्धेत 55  वर्षांनी विजयाचा झेंडा फडकवणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचे कौतुक करावं तितकं कमी... मैदानावरच नव्हे तर बाहेरही या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सरावाला उशीरा येणं, जेवताना मोबाईल वापरणं, अशा अनेक चुकांसाठी प्रशिक्षक स्टीफन कॉनस्टंस्टाईन यांनी खेळाडूंना दंड लावला होता. त्या दंडातून जमा झालेली रक्कम खेळाडूंनी अंध फुटबॉलपटूना देण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम फार नसली तरी सामाजिक भान जपणाऱ्या या खेळाडूंचे क्रीडा वर्तुळात कौतुक होत आहे. ब्यू टायगर्सने दिलेल्या 50000 हजारातून अंध फुटबॉलपटूंसाठी बॉल खरेदी करण्यात येणार आहेत. प्रशिक्षक कॉनस्टंस्टाईन म्हणाले," समाजाचे आपण देणं लागतो, याचे भान राखणे गरजेचे आहे. अंध फुटबॉलपटूंसाठी तयार करण्यात येणाऱ्या एका बॉलची किंमत 50 डॉलर आहे. त्यामुळे आमच्या मदतीतून ते काही बॉल विकत घेऊ शकतील. संघातील प्रत्येक खेळाडूकडून आम्ही काही रक्कम जमा केली. त्याशिवाय दंड म्हणून आम्ही काही रक्कम जमा केली होती, तीही यात जोडण्यात आली. ही फार मोठी रक्कम नाही, परंतु त्यामागच्या आमच्या भावनांना सीमा नाही.'' भारतीय संघाने आशियाई स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात थायलंडला 4-1 असे नमवले. भारतीय संघाच्या विजयात छेत्रीने दोन गोल केले होते, तर अनिरुद्ध थापा आणि जेजे लाल्पेखलूआ यांनी प्रत्येकी एक गोल केला होता. उदांता सिंगनेही गोल करण्यात मोलाचे सहकार्य केले. अ गटातील दुसऱ्या सामन्यात भारतासमोर गुरुवारी संयुक्त अरब अमिराती यांच्याशी भिडावे लागणार आहे. 

टॅग्स :Sunil Chhetriसुनील छेत्रीFootballफुटबॉल