शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Football: मुंबई, ठाण्यात फुटबॉलची वाढती क्रेझ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 15:14 IST

Football: आयपीएलचा थरार संपला आ आणि त्यानंतर जागति कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याची चुरसही संपली. यानंतर सुरू झाली ती फुटबॉलची क्रेझ

- रोहित नाईक(वरिष्ठ उपसंपादक)आयपीएलचा थरार संपला आ आणि त्यानंतर जागति कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याची चुरसही संपली. यानंतर सुरू झाली ती फुटबॉलची क्रेझ याला कारणही तसेच म्हणजे, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीयांना जल्लोषाची संधी दिली ती फुटबॉल संघाने लेबनॉन संघाला अंतिम फेरीत नमवून भारताने इंटरकॉन्टिनेंटल कप पटकाविला. यानंतर सॅफ अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४-० असा धुव्वा उडविला आणि सुरू झाली फुटबॉलची चर्चा.

पूर्वी मुंबईच्या गल्लीबोळांत फुटबॉल खेळला जायचा, हे आजच्या पिढीला सांगितले तर त्यांना खरे वाटणार नाही. २०१७ मध्ये भारतात झालेला १७ वर्षांखालील विश्वचषक भारतीय फुटबॉलसाठी मैलाचा दगड ठरला. फुटबॉलची जागतिक संस्था असलेल्या फिफाची कोणतीही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच पार पडली होती. मुंबईत कुलाबा येथील कुपरेज स्टेडियम म्हणजे फुटबॉलप्रेमींचे सर्वांत आवडते स्थळ. 

 एमएसएसएची मोलाची भूमिका-  मुंबईमध्ये शालेय फुटबॉल स्पर्धा मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या (एमएसएसए) वतीने रंगतात. यामध्ये सुमारे ४०० हून अधिक शालेय संघ सहभागी होतात.- शालेय स्पर्धा गाजविणाया उदयोन्मुख खेळाडूंना एमएफएच्या विशेष शिबिरांमार्फत प्रशिक्षणही मिळते आणि त्यांच्या स्पर्धात्मक फुटबॉलचा पाया भक्कम केला जातो. 

नोकरीच्या संधीएमएफएच्या एलिट गटात बलाढ्य संघांचा समावेश असतो. यामध्ये प्रामुख्याने कॉर्पोरेट्स आणि सरकारी संघाचा सहभाग असतो, त्यामुळेच गुणवान खेळाडूंना फुटबॉलच्या माधमातून नोकरीची संधीही असते.

स्पर्धांचा धडाकामुंबई फुटबॉल असोसिएशनच्या (एमएफए) वतीने मुंबईमध्ये फुटबॉल स्पर्धाचे आयोजन केले होते. सुमारे ३०० हून अधिक क्लब्स संघ 'एमएफए शी संलग्न आहेत. थर्ड डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन, फर्स्ट डिव्हिजन, कॉर्पोरेट लीग, वुमन्स सुपर लीग, सुपर कॉर्पोरेट लीग, सुपर प्रीमियर लीग आदी स्पर्धा रंगतात.

टॅग्स :FootballफुटबॉलMumbaiमुंबईthaneठाणे