शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

युव्हेंटसला 'अच्छे दिन'; रोनाल्डोपाठोपाठ आणखी एक फुटबॉल स्टार ताफ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 11:50 IST

रेयाल माद्रिद क्लबसोबतचा नऊ वर्षांचा सुखी प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंटसची निवड का केली, हा प्रश्न अजूनही बुचकळ्यात टाकत असताना आणखी एक स्टार या क्लबच्या वाटेवर आहे.

मुंबई - रेयाल माद्रिद क्लबसोबतचा नऊ वर्षांचा सुखी प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंटसची निवड का केली, हा प्रश्न अजूनही बुचकळ्यात टाकत असताना आणखी एक स्टार या क्लबच्या वाटेवर आहे. रेयाल माद्रिदशी जोडलेला हा स्टार रोनाल्डोपाठोपाठ युव्हेंटसच्या ताफ्यात येत असल्याने इटालियन क्लबला अच्छे दिन आले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रेयालचे माजी प्रशिक्षक झिनेदिन झिदान युव्हेंटसच्या क्रीडा अधिकारी म्हणून रूजू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा झिदान-रोनाल्डो या जोडीला एकत्र पाहण्याची उत्सुकता लागली आहे.रेयाल माद्रिद क्लबला विक्रमी सलग तिसरे चॅम्पियन्स लीग जेतेपद जिंकून दिल्यानंतर झिदान यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विश्वचषक स्पर्धा संपताच माद्रिदचा प्रमुख खेळाडू रोनाल्डोनेही क्लबला सोडचिठ्ठी दिली. रोनाल्डोने युव्हेंटसची निवड केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. युव्हेंटसच्या क्रीडा अधिकारी म्हणून झिदान यांची नियुक्ती होणार असल्याच्या वृत्ताने त्यात अधिक भर घातली. 17 वर्षांनंतर झिदान तुरीनच्या या क्लबमध्ये दाखल होणार आहेत. 1996 ते 2001 या कालावधीत झिदान यांनी खेळाडू म्हणून क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलSportsक्रीडा