Benjamin Mendy : "मी १०,००० महिलांसोबत सेक्स केलाय!", वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूच्या दाव्याने क्रीडा विश्वात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 05:59 PM2022-08-19T17:59:48+5:302022-08-19T18:24:27+5:30

I had sex with 10,000 women : २८ वर्षीय फुटबॉलपटू बेंजामिन मेंडी ( Benjamin Mendy) याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयात खटला सुरू आहे.

French international footballer Benjamin Mendy said he had slept with 10,000 women, rape trial hears | Benjamin Mendy : "मी १०,००० महिलांसोबत सेक्स केलाय!", वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूच्या दाव्याने क्रीडा विश्वात खळबळ

Benjamin Mendy : "मी १०,००० महिलांसोबत सेक्स केलाय!", वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूच्या दाव्याने क्रीडा विश्वात खळबळ

googlenewsNext

I had sex with 10,000 women : २८ वर्षीय फुटबॉलपटू बेंजामिन मेंडी ( Benjamin Mendy) याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयात खटला सुरू आहे. मँचेस्टर सिटीच्या या स्टार फुटबॉलपटूवर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तिच्यासह अन्य चार महिलांनीही बेंजामिनने त्यांच्यासोबत दुष्कर्म केल्याचा दावा केला आहे. २०१८च्या फिफा वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्स संघाचा तो सदस्य होता. रिपोर्टनुसार बेंजामिनने एका महिलेचा फोन घेतला आणि तिला फसवून बेडरूममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. चेस्टर क्राऊन न्यायालयात ऑक्टोबर २०२०मध्ये सांगितले गेले होते की बेंजामिन व त्या महिलेची भेट एका बारमध्ये झाली होती. त्यावर आज पुन्हा सुनावणी झाली आणि त्यावेळी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. 

फोन घेऊन रुममध्ये गेला अन्...  
बेंजामिन हा त्याच्या मँचेस्टर सिटी क्लबमधील सहकारी जेसी लिंगार्ड याच्यासोबत बारमध्ये होता. महिलीने सांगितले की, घरी पोहोचल्यानंतर बेंजामिनने फिंगरप्रिंटने बेडरूमचा दरवाजा उघडला. तोपर्यंत बेंजामिनने माझा फोन हातातून हिसकावला आणि तो मागण्यासाठी मी बेडरूमच्या आत गेली. तेव्हा बेंजामिन म्हणाला आता दरवाजा लॉक झालाय आणि तू आत अडकली आहेत. त्यानंतर बेंजामिनने बलात्कार  केला. नकार देऊनही त्याने जबरदस्ती केली. तेव्हा बेंजामिनने मला सांगितले की त्याने १० हजार महिलांसोबत सेक्स केला आहे.  


बेंजामिनवर पाच महिलांनीही बलात्काराचा आरोप केला आहे, परंतु त्याने हा आरोप फेटाळून लावला होता. 

Web Title: French international footballer Benjamin Mendy said he had slept with 10,000 women, rape trial hears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.