शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

FIFA World Cup Quarter finals : पाचवा दावेदारही OUT, ब्राझिलची एक्सिट !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 02:05 IST

जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरूग्वे यांच्या पाठोपाठ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाच्या पाचव्या दावेदाराला घरचा रस्ता धरावा लागला. बेल्जियमने अनपेक्षित निकाल नोंदवताना 2-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

कजान -  जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरूग्वे यांच्या पाठोपाठ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाच्या पाचव्या दावेदाराला घरचा रस्ता धरावा लागला. बेल्जियमने अनपेक्षित निकाल नोंदवताना 2-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. 1986 मध्ये त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. ब्राझिलने अखेरच्या मिनिटाला सोप्या संधी गमावल्याने त्यांना विजय खेचून आणता आला नाही. 2002 नंतर त्यांची जेतेपदाची पाटी कोरीच राहीली आहे. उपांत्य फेरीत बेल्जियमला फ्रान्सचा सामना करावा लागणार आहे.  

सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझिलच्या वाट्याला पहिल्या सत्रात अपयश आले. गोलरक्षक थिबाऊट कोर्टोइस आणि खेळाडूंनी अप्रतिम बचाव करत बेल्जियमने 2-0 अशा फरकाने ब्राझिलला पहिल्या सत्रात पिछाडीवर टाकले. बेल्जियम आणि ब्राझील या दोन्ही संघानी सुरूवातीपासून आक्रमणावरच भर दिला होता. बेल्जियमचे खेळाडू माजी विजेत्यांवर भारी पडताना पाहायला मिळाले. सामन्याच्या 13व्या मिनिटाला बेल्जियमने आघाडी घेतली. व्हिसेंट कम्पनीच्या कॉर्नर किकवरील चेंडू हेडरव्दारे गोलजाळीवरून टोलावण्याचा ब्राझिलच्या फर्नांडीनोचा प्रयत्न फसला. चेंडू त्याच्या हाताच्या कोप-याला लागून जलद गतीने गोलजाळीत विसावला आणि प्रतिस्पर्धीच्या स्वयंगोलवर बेल्जियमने आघाडी घेतली. त्यानंतर सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझीलच्या खेळाडूंना यशप्राप्ती होत नव्हती. 31व्या मिनिटाला डेव्हीड ब्रुयनेने लाँग रेंजवरून अप्रतिम गोल करत बेल्जियमची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील 100 वा गोल ब्रुयनेच्या नावावर नोंदवला गेला आहे.दुस-या सत्रात ब्राझिलने विलियनला बाकावर बसवून फर्मिनोला पाचारण केले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या सत्रात दोन किंवा त्याहून अधिक गोलने पिछाडीवरून एकाही संघाला विजय मिळवता आलेला नाही. ब्राझिलने विजयासाठी जंगजंग पछाडले, परंतु नशीब त्यांच्यावर रुसले होते. गोलपोस्टच्या अगदी जवळ जाऊनही त्यांना गोल करता येत नव्हता. प्रत्येकवेळी त्यांच्या तोंडचा घास कुणीतरी पळवत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे ब्राझिलचे खेळाडू वैतागलेले पाहायला मिळाले. 76व्या मिनिटाला अखेर ब्राझिलला यशप्राप्त झाले. रेनाटो ऑगस्टोने अप्रतिम हेडर लगावत ब्राझिलचे गोल खाते उघडले. 21 प्रयत्नांनंतर ब्राझिलला मिळालेले हे पहिले यश ठरले. त्यानंतर सोप्या संधीवर गोल करण्यात आलेले अपयश ब्राझिलच्या पराभवाला कारणीभूत ठरले. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा