शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सर्व आयोजन स्थळे सज्ज - प्रफुल्ल पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 05:38 IST

फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सर्व आयोजन स्थळे सज्ज असल्याची माहिती भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी दिली.

नवी दिल्ली : फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सर्व आयोजन स्थळे सज्ज असल्याची माहिती भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी दिली.६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत चालणा-या स्पर्धेला आता दहा दिवस उरले आहेत. एकूण सहा आयोजन स्थळांवर सामने खेळविले जाणार असून यापैकी पाच आयोजन स्थळे स्थानिक आयोजन समितीच्या सुपूर्द करण्यात आली आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आज बुधवारी सोपविले जाईल, असे पटेल यांनी सांगितले.स्थानिक आयोजन समितीचे चेअरमन असलेले पटेल पत्रकारांशी बोलताना म्हणाले,‘२०१२ मध्ये सुरू झालेला आयोजन तयारीचा प्रवास रोमहर्षक ठरला. सर्वच पायाभूत सुविधा साकारण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदा फिफा कार्यकारी समितीची बैठक भारतात कोलकाता येथे २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत होणार आहे. फिफाने भारतातील आयोजन स्थळे आणि सोईसुविधा यावर समाधान व्यक्त केले आहे.’ भारताचा सलामीचा सामना ६ आॅक्टोबर रोजी होणार असून या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारताचा संघ पहिल्यांदा फिफाच्या एखाद्या स्पर्धेत सहभागी होत असून सर्वच खेळाडू उत्साही असल्याचे पटेल यांनी सांगितले. फिफाच्या २० वर्षांखालील विश्वचषकाच्या यजमानपदासाठी बोली लावण्यासंदर्भात विचारताच पटेल म्हणाले,‘ आमच्याकडे पायाभूत सुविधा तयार आहे. आम्ही फिफाकडे २० वर्षे गटाच्या विश्वचषकासाठी बोली लावण्याचा मुद्दा लावून धरणार आहोत.’ १७ वर्षे गटाच्या संघावर स्पर्धेनंतरही मेहनत सुरूच राहील. कोचेसना तसे निर्देश देण्यात आले आहेत. आमच्याकडे १६ वर्षे गटाचा संघदेखील तयार आहे.विविध गटाच्या संघ बांधणीसाठी एआयएफएफ मेहनत घेत असल्याची माहिती पटेल यांनी दिली.भारतीय संघाचे कोच डी माटोस यांना संघाच्या तयारीबाबत विचारताच ते म्हणाले,‘ मी फेब्रुवारीत सुरुवात केली. सहा महिन्यात मी त्यांच्यावर मेहनत घेतली. आमचे लक्ष्य चांगली कामगिरी हेच असेल. यजमान म्हणून दडपण नाहीच.(वृत्तसंस्था)पहिल्या सामन्याची २० हजार तिकिटांची विक्रीमुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होणाºया पहिल्या सामन्यासाठी २० हजारहून तिकिटांची विक्री झाली आहे. ६ आॅक्टोबर रोजी हा सामना होईल. सूत्रांनुसार, या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ४५ हजार एवढी आहे. स्पर्धा सुरू होण्यास आता केवळ दहा दिवस उरले आहेत. पहिल्या दोन सामन्यांची सर्व तिकिटे विकली जाईल, अशी आशा आहे.‘तगड्या संघांना टक्कर देण्यास सज्ज’देशात पहिल्यांदाच होणाºया १७ वर्षांखालील फुटबॉल महासंग्रामासाठी गेल्या दोन वर्षांपासून खेळाडू घाम गाळत आहेत. या मोठ्या स्पर्धेत आम्ही तगड्या संघांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालो आहोत, असा विश्वास भारतीय कर्णधार अमरजित याने व्यक्त केला.विश्व दर्जाचे‘सेंटर आॅफ एक्सलन्स’अ.भा. फुटबॉल महासंघ खेळाडूंसाठी सर्वसुविधायुक्त असे विश्व दर्जाचे ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’स्थापन करणार आहे. ते कुठल्या शहरात होणार हे अद्याप निश्चित नाही. स्थळ भारतातील फिफा विश्वचषक संपल्यांनतर जाहीर होणार असल्याची घोषणा पटेल यांनी केली.या सेंटरमध्ये सरावाच्या सुविधांसह जलतरण तलाव आणि अन्य सोई राहतील. यावर १०० कोटीचा खर्च अपेक्षित असून फिफासह खासगी प्रायोजकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पटेल म्हणाले.सराव सामन्यांसाठी मोफत प्रवेशविश्वचषकाआधी अंधेरीच्या फुटबॉल एरिनामध्ये दोन सराव सामन्यांसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश राहील. येथे ब्राझील- न्यूझीलंड हा सामना २८ सप्टेंबर रोजी आणि न्यूझीलंड- इंग्लंड सामना १ आॅक्टोबर रोजी खेळविला जाईल.

टॅग्स :Sportsक्रीडा