शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Fifa World Cup 2018: ब्राझीलसाठी कोटिन्होनं गोल केला, तेव्हा नेमार कुठे होता बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 12:35 IST

ब्राझीलने 'दे दणादण' आक्रमणं करूनही स्वित्झर्लंडनं त्यांना बरोबरीत रोखलं. नेमारकडून ब्राझीलच्याच नव्हे, तर जगभरातील फुटबॉलप्रेमींना खूप आशा होत्या, पण....

मॉस्कोः ब्राझीलचा स्टार नेमारचा 'दे मार' खेळ बघण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक असताना, फिलीप कोटिन्होनं झंझावाती गोल झळकावून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. हा गोल झाला, तेव्हा नेमारची अवस्था काय होती, हे पाहिलं तर बऱ्याच गोष्टींची सहज कल्पना येऊ शकते. 

ब्राझीलच्या एकमेव गोलमध्ये नेमारची भूमिकाही महत्त्वाची होती. त्याचा पास मोलाचा ठरला. परंतु, त्यानंतर त्याला काहीच करता आलं नाही. कारण, तो चक्रव्यूहातच अडकला होता. चेंडू गोलपोस्टजवळ असताना नेमार धोकादायक ठरू शकतो, हे हेरून स्वित्झर्लंडच्या दोन-तीन नव्हे तर पाच खेळाडूंनी त्याला घेरलं होतं. हे एका अर्थाने ब्राझीलच्या पथ्यावरच पडलं. कारण, नेमार अडकल्याचं पाहून कोटिन्होनं किक लगावली आणि कारकिर्दीतील सर्वोत्तम आणि सर्वात उपयुक्त गोल साकारला.  

सर्वाधिक फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलेल्या आणि यंदाही जगज्जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये असलेल्या ब्राझीलला सलामीच्या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने त्यांचे चाहते थोडे हिरमुसलेत. 'दे दणादण' आक्रमणं करूनही स्वित्झर्लंडनं त्यांना बरोबरीत रोखलं. नेमारकडून ब्राझीलच्याच नव्हे, तर जगभरातील फुटबॉलप्रेमींना खूप आशा होत्या. ख्रिस्टियानो रोनाल्डोसारखी जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित होती. पण, नेमार निष्प्रभ ठरल्याचं पाहायला मिळालं. स्वित्झर्लंडने त्याला असं 'ट्रॅप' केलं होतं की ठरावीक मर्यादेपलीकडे तो काहीच करू शकला नाही. अर्थात, त्यातून मार्ग काढण्याचं कसब त्याला जमलं नाही आणि फ्री किकच्या चालून आलेल्या संधी त्यानं कर्माने गमावल्या, हेही तितकंच खरं.    

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSwitzerlandस्वित्झर्लंडBrazilब्राझील