शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018: मेस्सीची पेनल्टी अडवणारा तो  ‘डायरेक्टर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 21:39 IST

सचिन कोरडेफुटबॉल विश्वचषकातील आइसलॅँड-अर्जेंटिना यांच्यातील सामन्यात सर्वाधिक लक्ष होते ते केवळ लियोनेल मेस्सी याच्यावर. फुटबॉल जगतातील हा दिग्गज या सामन्यात काय करामत करणार? याची उत्सुकता लागली होती. मात्र, मेस्सीने त्यावर पाणी फेरले. सामना जिंकून देण्याची नामी संधी मेस्सीला मिळाली होती. पेनल्टीवर मारलेला मेस्सीचा फटका आइसलॅँडचा गोलरक्षक हॅनेस हॉलडर्सन याने अडवला ...

ठळक मुद्दे पेनल्टीवर मारलेला मेस्सीचा फटका आइसलॅँडचा गोलरक्षक हॅनेस हॉलडर्सन याने अडवला आणि तोच या सामन्यातील हिरो ठरला.

सचिन कोरडे

फुटबॉल विश्वचषकातील आइसलॅँड-अर्जेंटिना यांच्यातील सामन्यात सर्वाधिक लक्ष होते ते केवळ लियोनेल मेस्सी याच्यावर. फुटबॉल जगतातील हा दिग्गज या सामन्यात काय करामत करणार? याची उत्सुकता लागली होती. मात्र, मेस्सीने त्यावर पाणी फेरले. सामना जिंकून देण्याची नामी संधी मेस्सीला मिळाली होती. पेनल्टीवर मारलेला मेस्सीचा फटका आइसलॅँडचा गोलरक्षक हॅनेस हॉलडर्सन याने अडवला आणि तोच या सामन्यातील हिरो ठरला.

 

गोल न झाल्याने मेस्सीसुद्धा खूप निराश झाला होता. त्यामुळे मेस्सीचा गोल अडवणारा हॅनेस हा आहे तरी कोण? हे जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर नेटिझन्सने शोधमोहीम सुरू केली. त्यात त्याच्या जीवनाची अनोखी कारकिर्द हाती लागली. हॅनेस हा व्यवसायाने चित्रपट दिग्दर्शकही आहे. ३४ वर्षीय या खेळाडूने प्रोफेशनल फिल्ड डायरेक्टर म्हणून सुरुवात केली होती. त्याने विविध म्युझिक व्हिडिओ, लघुपट आणि ‘लिनिलोग्गा’ हा चित्रपटही दिग्दर्शित केला आहे. आता हा डायरेक्टर फुटबॉलच्या मैदानातही प्रसिद्धीच्या झोतात आहे. 

 

विश्वचषकातील ‘क’ गटातील आइसलॅँड-अर्जेंटिना हा सामना बरोबरीवर आटोपला. मात्र, आइसलॅँड गटात आपण सामना जिंकल्याप्रमाणेच वातावरण होते. त्याचे सर्व श्रेय त्यांनी हॅनेस यालाच दिले आहे. त्याचा तो अप्रतिम बचाव अभिनंदनास पात्र ठरत आहे. विश्वचषकापूर्वी हॅनेस याने मेस्सीच्या खेळाचा अभ्यास केला होता. तो रोज मेस्सीचे व्हिडिओ पाहायचा. अखेर त्याची ही मेहनत फळाला आली. सामन्यानंतर त्याने याबाबत प्रतिक्रिया सुद्धा दिली. यात त्याने म्हटले की, मी मेस्सीचा अभ्यास केला होता. होमवर्क केले होते, त्यामुळे मेस्सीची पेनल्टी अडवू शकलो. अशी स्थिती येईल, याची जाणीव होती. 

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉलFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८