शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

FIFA Football World Cup 2018 : विश्वविजेते सलग तिसऱ्यांदा साखळीतच बाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 09:00 IST

१९६६ सालापासून प्रत्येक वेळी नवा विश्वविजेता

ठळक मुद्दे९६२ पासून कोणताही संघ सलग दोन वेळा विश्वचषक जिंकू शकलेला नाही. एवढेच नाही तर सलग तिसऱ्यांदा गतविजेत्या संघाला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. 

ललित झांबरे : प्रत्येक वेळी नवा विजेता, ही विश्वचषक फुटबॉलची परंपरा यंदासुद्धा कायम राहणार आहे. गतविजेत्या जर्मनीच्या साखळीतच गारद होण्याने ही मालिका अबाधित ठेवली आहे.  १९६२ पासून कोणताही संघ सलग दोन वेळा विश्वचषक जिंकू शकलेला नाही. एवढेच नाही तर सलग तिसऱ्यांदा गतविजेत्या संघाला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. 

जर्मन संघ विद्यमान विश्वविजेता म्हणून यावेळी रशियात मैदानात उतरला खरा पण त्यांची कामगिरी सुरूवातीपासूनच खराब राहिली. आधी मेक्सिको आणि बुधवारी दक्षिण कोरियाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे  ‘एफ’ गटात चक्क शेवटच्या स्थानी राहिले. 

आपले विश्वविजेतपद कायम राखणारा ब्राझील हा शेवटचा संघ. त्यांनी १९५८ नंतर १९६२ ला पुन्हा विश्वचषक पटकावला. मात्र त्यानंतर सलग दुसºयांदा विश्वचषक कुणाच्याच हाती लागलेला नाही.

१९६६ -ब्राझील१९६६ च्या स्पर्धेवेळी ब्राझीलला विश्वविजेतेपदाच्या हॅट्ट्रीकची संधी होती पण हंगेरी व पोर्तुगालकडून १-३ अशा सारख्याच फरकाच्या पराभवाने ते गटातच बाद झाले. 

१९७०- इंग्लंडइंग्लंडच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली पण जर्मनीविरूद्ध २-० अशी सुरूवात केल्यावरही शेवटी ३-२ अशा पराभवाने त्यांचे आव्हान संपवले.

१९७४- ब्राझीलविश्वविजेत्यांनी पहिली फेरी पार करण्यात यश मिळवले मात्र दुसºया फेरीत नेदरलँडकून ०-२ असा पराभव त्यांचे आव्हान संपविणारा ठरला.

१९७८- पश्चिम जर्मनीजर्मन संघाने दुसरीफेरी गाठली खरी पण दुसºया फेरीत ते एकही सामना जिंकू शकले नाहीत. नेदरलँड, इटली व ऑस्ट्रीयाकडून त्यांना पराभव पत्करावे लागले.

१९८२- अर्जेंटिनादिएगो मॅराडोनाच्या या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनी संघ दुसºया फेरीत बाद झाला. दुसºया फेरीत इटली व ब्राझीलकडून त्यांना हार पत्करावी लागली.

१९८६- इटलीइटलीने साखळीच्या तीन सामन्यात एकदाही हार न पत्करता (१ विजय, दोन बरोबरी) बाद फेरी गाठली. पण बाद फेरीत फ्रान्सने २-० असा विजय मिळवून त्यांचे आव्हान संपवले.

१९९०- अर्जेंटिनाअर्जेंटिनाचा संघ अर्र्जेंटीना व इटलीवर पेनल्टीजवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडकला होता पण विश्वविजेतपदाच्या सामन्यात आंद्रीयास ब्राम्हेच्या पेनल्टीवरील गोलने जर्मनीला विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि अर्जेंटीनाचा सलग दुसºयांदा विश्वचषक जिंकण्याचा मान हुकला. 

१९९४- जर्मनीजर्मन संघाची वाटचाल उपांत्यपूर्व फेरीत बल्गेरियाने रोखली. मथायसने आघाडी दिल्यावरसुद्धा त्यांनी सामना १-२ असा गमावला.

१९९८- ब्राझीलब्राझीलचा संघ नेदरलँडवर पेनल्टीजवर विजय मिळवत अंतिम फेरीत पोहचला पण अंतिम फेरीत फ्रान्सविरुद्ध ते एकसुद्धा गोल करू शकले नाहीत. उलट फ्रान्सकडून त्यांनी ०-३ असा मार खाल्ला.

२००२- फ्रान्सविश्वविजेत्या संघाची कदाचित ही सर्वात खराब कामगिरी असावी. १९९८ मध्ये विश्वविजेतेपद पटकावलेल्या फ्रेंच संघाला साखळी फेरीतच बाद होताना एकसुद्धा गोल करता आला नाही. सेनेगलने १-० आणि डेन्मार्कने २-० अशी त्यांना मात दिली तर उरूग्वेने गोलशून्य बरोबरीत रोखले.

२००६- ब्राझीलयावेळी फ्रान्सने गतविजेत्या ब्राझीलचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपवले आणि त्यास कारण ठरला तो थिएरे हेन्रीचा ५७ व्या मिनिटाचा गोल.

२०१०- इटलीविश्वविजेते इटली पहिली फेरीसुद्धा पार करू शकले नाहीत. त्यांना गटवार साखळीत स्लोव्हेकियाकडून पराभव पत्करावा लागला तर पेराग्वे आणि न्यूझीलंडने त्यांना बरोबरीत रोखले.

२०१४- स्पेनपुन्हा एकदा विश्वविजेता संघ  गटवार साखळीतच बाद झाला. यावेळी स्पेनला नेदरलँडने १-५ असा सणकून मार दिला तर चिलीनेही ०-२ असे पराभवाचे तोंड पहायला लावले.

२०१८- जर्मनी२०१० व २०१४ नंतर  विश्वविजेता संघ गटवार साखळीच्या बाहेर पडू शकला नाही. जर्मन संघाला मेक्सिको व दक्षिण कोरियाने पराभवाचे धक्के दिले.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Germanyजर्मनीFootballफुटबॉल