शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

FIFA Football World Cup 2018 : विश्वचषकातही अंधश्रद्धाळू फुटबॉलपटू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 09:00 IST

कोणाला जुन्या कपड्यांचा मोह सोडवत नाही, तर कोणी सामना सुरू होण्यापूर्वी नेहमीची विशेष कृती करण्यात कसर ठेवत नाही. हे सगळे अंधश्रद्धेपोटी घडत असले, तरी त्यामागचा उद्देश शुद्ध असतो.

ठळक मुद्दे मोरोक्कोचे प्रशिक्षक हर्व रेनार्ड प्रत्येक सामन्यासाठी पांढऱ्या रंगाचाच शर्ट परिधान करतात.

सचिन खुटवळकर :  सध्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंच्या आहार, जीवनशैली, व्यायाम व कामगिरीवर चर्चा झडत आहे. त्याचबरोबर काही खेळाडू व प्रशिक्षकांची अंधश्रद्धाही तितकीच चर्चेचा विषय ठरत आहे. कोणाला जुन्या कपड्यांचा मोह सोडवत नाही, तर कोणी सामना सुरू होण्यापूर्वी नेहमीची विशेष कृती करण्यात कसर ठेवत नाही. हे सगळे अंधश्रद्धेपोटी घडत असले, तरी त्यामागचा उद्देश शुद्ध असतो. आपली कामगिरी चांगली व्हावी व संघाला त्याचा फायदा व्हावा, असा हेतू ठेवून खेळाडू अंधश्रद्धा बाळगताना दिसतात.

फुटबॉलपटूंच्या अंधश्रद्धेला खूप मोठी परंपरा आहे. कोलंबियन गोलरक्षक रेने हिगुएटा हा यात आघाडीवर होता. निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र वापरल्यामुळे आपला संघ चांगली कामगिरी करतो, यावर त्याचा गाढ विश्वास होता. त्यामुळे फुटबॉल खेळू लागल्यापासून निवृत्त होईपर्यंत त्याने निळ्या अंतर्वस्त्राचा कटाक्षाने वापर केला. असे अनेक किस्से फुटबॉल जगतात चर्चेत असतात. सध्या रशियात सुरू असलेली स्पर्धाही त्याला अपवाद नाही. काही गोष्टी योगायोगाने जुळून येत असल्या, तरी एखाद्या खेळाडूला त्या वेळी तो शकुन वाटतो आणि त्या गोष्टी त्याच्या सवयीचा भाग बनतात. भलेही त्याला अंधश्रद्धाळू म्हणून हिणवले गेले, तरीही!

याबद्दल आश्चर्य नको...- जर्मनीचा स्ट्रायकर मारियो गोमेझ याची अंधश्रद्धा काहीशी हास्यास्पद आहे. मैदानात उतरण्यापूर्वी तो अगदी डाव्या बाजूला असणाऱ्या युरिनलचा वापर करतो.- गोमेझचा संघसाथी ज्युलियन ड्राक्सलर हा विशिष्ट वासाचे दोन-तीन परफ्युम मारूनच सामन्यासाठी सज्ज होतो. अर्थात ही त्याची अंधश्रद्धा असून परफ्युमचा आणि सामन्यादरम्यान येणाऱ्या घामाच्या वासाचा काहीही संबंध नसल्याचे त्याचे संघसहकारी गमतीने सांगतात.- इंग्लंडचा गेले अली ११व्या वर्षापासून एकच शीन गार्ड (पायावरील आवरण) वापरतो. त्याचाच सहकारी फिल जोन्स मैदानावरील पांढऱ्या रेषेवर पाय टाकायचे नेहमीच टाळतो. खेळकर स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला ब्राझिलचा मार्सेलो मैदानात जाताना पांढऱ्या रेषेवरून उजवे पाऊल आधी टाकतो. ही कृती अनेक फुटबॉलपटू करताना दिसतात.- २0१२ साली आफ्रिका चषक स्पर्धेत झांबियाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर मोरोक्कोचे प्रशिक्षक हर्व रेनार्ड प्रत्येक सामन्यासाठी पांढऱ्या रंगाचाच शर्ट परिधान करतात.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलGermanyजर्मनीrussiaरशिया