शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

FIFA Football World Cup 2018 :  हे सहा विक्रम ठरले खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 13:06 IST

प्रत्येक विश्वचषक स्पर्धेप्रमाणेच या विश्वचषकामध्येही नवनवे विक्रम नोंदवले गेले. त्यापैकी सहा विक्रम खास ठरले आहेत. 

मॉस्को -  फ्रान्सने क्रोएशियावर 4-2 अशा फरकाने मिळवलेल्या दणदणीत विजयाबरोबरच यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा समारोप झाला आहे. प्रत्येक विश्वचषक स्पर्धेप्रमाणेच या विश्वचषकामध्येही नवनवे विक्रम नोंदवले गेले. त्यापैकी सहा विक्रम खास ठरले आहेत.  गोलची बरसात यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत 64 सामने खेळवले गेले. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी मिळून 169 गोल केले. केवळ एक सामनाच गोलशून्य बरोबरीत सुटला. यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात सरासरी 2.6 गोल नोंदवले गेले. सर्वाधिक पेनल्टी रशियामध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत प्रथमच व्हिडीओ असिस्टंट रेफरी ( व्हीएआर ) प्रणालीचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे या विश्वचषकात सर्वाधिक 29 पेनल्टी देण्यात आल्या. त्यामुळे पेनल्टीवर सर्वाधिक गोलही या विश्वचषकात नोंदवले गेले.  याआधी 2002 च्या विश्वचषकात 18 पेनल्टी देण्यात आल्या होत्या. या पेनल्टीचा सर्वाधिक फायदा इंग्लंडच्या हॅरी केनने उचलला. त्याने संपूर्ण स्पर्धेत पेनल्टीवर तीन गोल केले. सर्वात युवा आणि सर्वाच ज्येष्ठ खेळाडूयंदाच्या विश्वचषकात फ्रान्सच्या एम्बापे (19) याने गोल करून इतिहास रचला. तो पेले (1958) यांच्यानंतर विश्वचषकात गोल करणारा कमी वयाचा पहिला खेळाडू ठरला. तर इजिप्तचा गोलरक्षक इमान अल हैदरी (45) हा विश्वचषक खेळणारा सर्वात बुजुर्ग खेळाडू ठरला.क्रोएशियाचे अतिरिक्त वेळेतील पलटवार अंतिम लढतीत पराभूत झालेल्या क्रोएशियाने अतिरिक्त वेळेतील चमत्कारी खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विश्वचषकात अतिरिक्त वेळेमध्ये सामन्याचे पारडे फिरवून क्रोएशियाने तीन सामन्यात विजय मिळवला. अंतिम फेरी गाठणारा छोटा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यापेक्षा थोड्या मोठ्या असलेल्या आणि जेमतेम 40 लाख लोकसंख्या क्रोएशियाने आपल्.ा कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा क्रोएशिया गेल्या 68 वर्षांतील सर्वात लहान देश ठरला. याआधी 1950 साली उरुग्वेने फिफाची अंतिम फेरी गाठली होती. सर्वात कमी रेड कार्ड  यंदाच्या विश्वचषकात व्हीएआर प्रणालीचा अवलंब करण्यात आलेला असल्याने खेळाडूंनी नियमांचे उल्लंघन करणे प्रकर्षाने टाळले. त्यामुळेच हिंसक कृत्यांसाठी यावेळच्या विश्वचषकात कुणालाही रेड कार्ड दाखवण्यात आले नाही. मात्र चार खेळाडूंना रेड कार्ड मिळाले.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल