शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

FIFA Football World Cup 2018 : उपांत्यपूर्व फेरीच्या थराराची सुरुवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 00:05 IST

फिफा विश्वचषक स्पर्धा आता अत्यंत रोमांचक वळणावर आली असून शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीच्या थराराला सुरुवात होईल. गेल्या तीन आठवड्यांमध्ये उच्च दर्जाचा खेळ, जबरदस्त उत्सुकता, थोडेफार वाद आणि काही अनपेक्षित निकाल अनुभवण्यास मिळाले.

अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)

फिफा विश्वचषक स्पर्धा आता अत्यंत रोमांचक वळणावर आली असून शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीच्या थराराला सुरुवात होईल. गेल्या तीन आठवड्यांमध्ये उच्च दर्जाचा खेळ, जबरदस्त उत्सुकता, थोडेफार वाद आणि काही अनपेक्षित निकाल अनुभवण्यास मिळाले.कोणी कल्पना केली असेल की, गतविजेते जर्मनीचे आव्हान साखळी फेरीतच संपेल? किंवा स्पेन, अर्जेंटिना आणि पोर्तुगाल यांसारख्या काही संभाव्य विजेत्या संघांचे आव्हान उप-उपांत्यपूर्व फेरीतच संपेल याचाही कोणी विचार केला नसेल.त्याचबरोबर ज्या संघांकडून साखळी फेरी पार होण्याची अपेक्षा बाळगली नव्हती, अशा काही संघांनी थेट अव्वल ८ स्थानांमध्ये जागा मिळवत सर्वांनाच चकित केले. यामध्ये नक्कीच स्वीडन, क्रोएशिया आणि यजमान रशिया यांचा उल्लेख करावा लागेल. या सर्वांमध्ये यजमान रशियाची कामगिरी अत्यंत लक्षवेधी ठरणारी आहे. कारण ते जागतिक क्रमवारीत ७०व्या स्थानी आहेत. यावरूनच घरच्या प्रेक्षकांकडून मिळणारा पाठिंबा किती महत्त्वाचा असतो हे कळून येतं.इंग्लंडनेही शानदार कामगिरी करताना कोलंबियाचे आव्हान उप-उपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआउटद्वारे परतावले. इंग्लंडसाठी ही एक नाट्यमय वाटचाल ठरली. त्यांच्याकडून नेहमीच खूप अपेक्षा असतात, पण गेल्या तीन दशकांपासून इंग्लंड संघ निराशा करत आला आहे. त्याचबरोबर थोड्याशा नशिबाची साथ मिळाल्याने जपाननेही बाद फेरी गाठली. बेल्जियमने ९४व्या मिनिटाला केलेला गोल केवळ जपानसाठीच नाही, तर जगातील फुटबॉलप्रेमींसाठी ‘हार्टब्रेकिंग’ ठरला. थोडक्यात या सामन्यातून लॅटिन अमेरिका आणि युरोपची असलेले फुटबॉलवरील वर्चस्व भविष्यात कमी होईल, याची चाहूल लागली आहे.खेळाडूंविषयी सांगायचे झाल्यास, विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व जगाचे लक्ष लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या कामगिरीवर लागले होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे पृथ्वीतलावरील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून पाहण्यात येते आहे आणि ही स्पर्धा या दोघांमधील अंतर ठरविण्यासाठी टाय - ब्रेकर ठरणार होती. परंतु, दुर्दैवाने दोघांनाही उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले नाही. दोघांनीही आपला लौकिक दाखवला, पण प्रतिस्पर्धींनी दोघांना कोंडीत पकडले. त्यामुळे विश्वचषक जेतेपदाविना दोघांच्या महानतेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे ब्राझीलचा नेमार थोडा उजवा ठरला. सुरुवातीला त्याचे दुखापतग्रस्त असणे संघासाठी चिंतेचा विषय ठरला होता, पण यानंतर त्याने चमकदार कामगिरी केली. मात्र तो संघाला अंतिम फेरीत नेऊन जगज्जेतेपद मिळवून देईल का? 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा