शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

Fifa Football World Cup 2018 :  फुटबॉलच्या आडून पुतिन यांचा राजकीय ‘गोल’ 

By सचिन खुटवळकर | Published: June 25, 2018 10:11 PM

फुटबॉलच्या आतापर्यंतच्या इतिहासात राजकीय स्तरावरील कटुता मिटविण्याच्या कामात फुटबॉल स्पर्धा हे प्रभावी माध्यम राहिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेही त्याला अपवाद नाहीत.

ठळक मुद्देइसिससारख्या अतिरेकी संघटनांचा संभाव्य धोका मोडून काढण्याची सर्व सज्जता रशियन सुरक्षा यंत्रणांनी केली आहे. एकूणच ‘राजकीय गोल’ साधण्यासाठी रशिया व पुतिन जोरकस प्रयत्न करत आहेत.

सचिन खुटवळकर :  फुटबॉल हे राजकीय हितसंबंध सुधारण्याचे माध्यम असू शकते का? या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेच द्यावे लागेल. फुटबॉलच्या आतापर्यंतच्या इतिहासात राजकीय स्तरावरील कटुता मिटविण्याच्या कामात फुटबॉल स्पर्धा हे प्रभावी माध्यम राहिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेही त्याला अपवाद नाहीत.

रशियामध्ये फुटबॉल सामने पाहण्यासाठी विविध देशांतील फुटबॉलप्रेमींसह वजनदार नेतेही रशियाला भेटी देत आहेत. याचा फायदा राजकीय हितसंबंध सुधारण्यासाठी उठविण्यात पुतिन यशस्वी ठरत आहेत. सौदी अरेबिया, कोरिया, इराण आदी देशांचे ताकदवान नेते रशियाच्या भेटीवर आहेत. या सर्वांशी सलोखा साधत पुतिन यांनी आपण किती ‘मुरलेला’ खेळाडू आहे याची प्रचीती आणून दिली. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पार पडल्यानंतर पुतिन यांच्या प्रयत्नांना कितपत यश येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या तरी रशियात फुटबॉल ज्वर शिगेला पोहोचलेला असून त्या माध्यमातून एक बलाढ्य देश म्हणून आपली प्रतिमा अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात रशियन मुत्सद्दी आहेत.

 आउट आॅफ द फुटबॉल - दुसऱ्या महायुद्धानंतर १९५४ साली खेळविण्यात आलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेकडे जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा एक उपक्रम या नजरेतूनच पाहिले गेले.- फुटबॉल वेड जगभरात दिसून येते. अनेक देशांनी सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या आयोजनांवर भर दिला. आश्चर्य म्हणजे, या देशांना त्याचा अनुकूल फायदाही झाला.- युरोपियन समुदायात स्थान मिळविण्यासाठी जर्मनीने आखलेल्या मोहिमेत फुटबॉल हा एक महत्त्वाचा दुवा होता. दक्षिण आफ्रिकेनेही आपल्या देशासह आफ्रिका खंडाला जगाच्या नजरेत आणण्यासाठी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पेलली.- सर्वात मोठा क्रीडा प्रकार म्हणून पसंती असलेला फुटबॉल एक धर्मच बनला आहे. स्वत: एक उत्तम क्रीडापटू असलेले पुतिन या माध्यमातून रशियाचा कसा फायदा होईल यासाठी पूर्ण ताकद पणाला लावत आहेत.- इसिससारख्या अतिरेकी संघटनांचा संभाव्य धोका मोडून काढण्याची सर्व सज्जता रशियन सुरक्षा यंत्रणांनी केली आहे. एकूणच ‘राजकीय गोल’ साधण्यासाठी रशिया व पुतिन जोरकस प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८russiaरशियाFootballफुटबॉल