शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वीच माजी विजेत्यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 20:57 IST

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अव्वल आठ संघ जेतेपदाच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज झाली आहेत. अव्वल किताबासाठीची खरी कसोटी सुरू होत असताना माजी विजेत्या संघाचा प्रमुख खेळाडू जायबंद झाल्याने चमूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे 1950नंतर विश्वचषक जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी उत्सुक असलेल्या उरूग्वेची शुक्रवारी फ्रान्सविरूद्धच्या लढतीत कसोटी लागणार आहे. 

मॉस्को -  फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अव्वल आठ संघ जेतेपदाच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज झाली आहेत. अव्वल किताबासाठीची खरी कसोटी सुरू होत असताना माजी विजेत्या संघाचा प्रमुख खेळाडू जायबंद झाल्याने चमूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे 1950नंतर विश्वचषक जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी उत्सुक असलेल्या उरूग्वेची शुक्रवारी फ्रान्सविरूद्धच्या लढतीत कसोटी लागणार आहे. पोर्तुगालविरूद्धच्या बाद फेरीतील सामन्यात उरूग्वेच्या एडिसन कवानीला दुखापत झाली होती. पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने त्या सामन्यात कवानीला आधार देत मैदानाबाहेर जाण्यास सहकार्य केले होते. त्याच सामन्यात कवानीने दुखापतीपूर्वी दमदार खेळ करत उरूग्वेचा विजय निश्चित केला होता. उरूग्वेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच्या प्रवासात नायक ठरलेला कवानी शुक्रवारच्या लढतीत न खेळण्याची शक्यता बळावली आहे. पोर्तुगालविरूद्धच्या सामन्यात 74 व्या मिनिटाला कवानीच्या पोटरीचे स्नायू ताणले गेले आणि त्याला मैदान सोडावे लागले होते. 

फ्रान्सविरूद्धच्या लढतीपूर्वी सराव सत्रात सलग तीन दिवस कवानीने सहभाग घेतला नाही. तो अद्यापही दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे तो उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याजागी संघात ख्रिस्तियन स्तुआनी किंवा ख्रिस्तियन रॉड्रीगेज यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. कवानी दुखापतीतून पुर्णपणे सावरला नसल्याची माहिती उरूग्वे फुटबॉल फेडरेशनने दिली आहे.  कवानीने चार सामन्यात तीन गोल केले आहेत. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८UruguayUruguayFootballफुटबॉलSportsक्रीडा