शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

FIFA Football World Cup 2018 : ‘पंचक ’भेदण्यास मेक्सिको प्रयत्नशील; बलाढ्य ब्राझीलविरुद्ध उपउपांत्यपूर्व लढत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 2:50 AM

मेक्सिको संघ फिफा विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत सोमवारी खेळेल त्यावेळी इतिहासाचे झुकते माप त्यांच्या बाजूने नसेल, पण सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत संघ बलाढ्य संघांना चकित करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे.

सेंट पीटर्सबर्ग : मेक्सिको संघ फिफा विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत सोमवारी खेळेल त्यावेळी इतिहासाचे झुकते माप त्यांच्या बाजूने नसेल, पण सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत संघ बलाढ्य संघांना चकित करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे.मेक्सिकोने सलग सातव्यांदा विश्वकप प्री-क्वॉर्टर फायनलमध्ये स्थान मिळवले आहे, पण संघाला यापूर्वी सहावेळा अंतिम १६ चा अडथळा पार करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पाचवा सामना खेळणे त्यांच्यासाठी मोठे लक्ष्य ठरले आहे. मेक्सिकोचा कर्णधार आंद्रेस गुआर्डेडो म्हणाला,‘पाचव्या लढतीत स्थान मिळवित इतिहास घडविणे यापेक्षा दुसरी कुठली संस्मरणीय कामगिरी नाही. मानसिकदृष्ट्या विचार करता आम्ही चांगले खेळाडू आहोत, पण आम्ही आगेकूच करण्यात यशस्वी ठरतो किंवा नाही, यावरच आमचे आकलन होईल. मेक्सिकोने यापूर्वी अंतिम १६ मध्ये थोड्या फरकाने लढती गमावल्या आहेत. संघाला १९९४ मध्ये बुल्गारियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. १९९८ व २००६ मध्ये अनुक्रमे जर्मनी व अर्जेंटिना या संघाविरुद्ध सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर सामने गमावले होते. चार वर्षांपूर्वी अखेरच्या क्षणी संघाला दोन गोल स्वीकारावे लागल्यामुळे पराभव पत्करावा लागला होता. आर्येन रोबेनने वादग्रस्त पेनल्टीवर गोल नोंदवत नेदरलँडला अंतिम आठमध्ये स्थान मिळवून दिले होते. (वृत्तसंस्था)ब्राझीलचे खडतर आव्हानब्राझील संघाला संथ सुरुवातीनंतर लय गवसली असून त्यांचे आव्हान परतवणे मेक्सिको संघासाठी सोपे नाही. कोलंबियन प्रशिक्षक युआन कार्लोस ओसोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली मेक्सिको संघ बेदरकारपणे खेळत आहे. त्याचसोबत ते प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवित खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत.संघाने सलामी लढतीत विश्व चॅम्पियन जर्मनीचा पराभव केला होता. त्या पराभवानंतर जर्मनी संघाला सावरताच आले नाही आणि ८० वर्षांत प्रथम विश्वकप स्पर्धेत त्यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८