शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Fifa Football World Cup 2018 :मेस्सीच्या खेळाने चाहते सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 2:36 AM

ज्याची सगळ्यांना आशा होती तेच झाले. अर्जेंटिनाने काल रात्री नायजेरियाला २-१ ने पराभूत केले. मला वाटते की, हा एक मोठा निकाल होता

अयाझ मेमन, संपादकीय सल्लागारज्याची सगळ्यांना आशा होती तेच झाले. अर्जेंटिनाने काल रात्री नायजेरियाला २-१ ने पराभूत केले. मला वाटते की, हा एक मोठा निकाल होता. एक मोठा विवाद सुरू होता. नेमके काय सुरू होते अर्जेंटिना आणि मेस्सीसोबत, चाहते नाराज होते. खेळाडूंचे प्रशिक्षकांसोबत वाद असल्याचेही समोर येत होते. मात्र ज्या प्रकारे संघ एकजुटीने खेळला ते पाहून वाटले नाही.मेस्सीचा खेळ शानदार होता. मेस्सीला विश्वातील सर्वोत्तम खेळाडू का मानले जाते हे त्याने दाखवून दिले. त्याने पहिला गोल केला तो शानदार होता. लाँग पासवर त्याने बॉलला नियंत्रणात आणले आणि गोल केला. त्याच्या खेळात जादू आहे. कारण तो खूप हट्टाकट्टा खेळाडू नाही. मात्र त्याने चेंडूवर नियंत्रण मिळवले. बॉलला खाली पडू दिले नाही. वरच्यावर घेत गोलजाळीची दिशा दाखवली. मात्र १-१ ने बरोबरी झाली. पेनल्टीवर नायजेरियाने गोल केला. त्यावेळी असे वाटत होते की सामना बरोबरीत सुटेल आणि अर्जेंटिना फिफा विश्वचषकातून बाहेर होईल. मात्र अखेरच्या ५ मिनिटात अर्जेंटिनाला गोल मिळाला.खास करून या विश्वचषकात मोरक्को आणि नायजेरियाने खूपच शानदार आणि आक्रमक खेळ केला. आधीच्या काळात डच संघ जसा खेळ करत होता, तसाच खेळ त्यांनी केला आहे. त्यांनी पासेस चांगले दिले. खेळाडूंमध्ये ताळमेळ चांगला होता. मात्र दुर्दैवाने हे दोन्ही संघ बाहेर झाले. पुढच्या स्पर्धांमध्ये त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागेल.बड्या संघांचा विचार केला तर स्पेन, फ्रान्स,अर्जेंटिना, बेल्जियम, रशिया हे संघ बाद फेरीत पोहचले आहेत. आता सर्वांचे लक्ष जर्मनी आणि फ्रान्सवर आहे. जर ते पराभूत झाले तर ते बाहेर होऊ शकतात. विशेषत: जर्मनी. कारण त्यांनी या आधीदेखील एक सामना गमावला आहे. जर्मनी आणि ब्राझीलने अजून बाद फेरीत प्रवेश केलेला नाही. जर्मनी हे गतविजेते आहेत आणि ब्राझील विश्व रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. एक सामना त्यांनी ड्रॉ केला आहे. त्यामुळे त्यांना एक सामना जिंकावा लागेल. या मोठ्या संघांना फॉर्ममध्ये येण्यास काही वेळ लागला आहे.

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलArgentinaअर्जेंटिनाSportsक्रीडा