शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : फेअर प्लेमुळे जपान बाद फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 21:46 IST

जपानला अखेरच्या साखळी सामन्यात पोलंडकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, फेअर प्ले मुळे जपानला बाद फेरीत प्रवेश करता आला.

ठळक मुद्देफेअर प्ले मुळे जपानला बाद फेरीत प्रवेश करता आला.

व्होलग्रोगॅड -   जपानला  फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात पोलंडकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सेनेगल आणि जपान यांच्यापैकी बाद फेरीत कोणाचे  तिकीट पक्के होइल याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, फेअर प्ले मुळे जपानला बाद फेरीत प्रवेश करता आला. जॅन बेडनारेक ५९ व्या मिनिटाला गोल करून पोलंडला विजय मिळवून दिला. 

जपानने ३ सामन्यांत केवळ २८ फाऊल्स केले. अन्य संघांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी होती. तीन सामन्यांत त्यांना ४ पिवळे कार्ड मिळाले. याउलट सेनेगलला ६ पिवळे कार्ड मिळाले. पोलंडविरूध्दच्या लढतीत त्यांना आणखी दोन पिवळे कार्ड दाखवण्यात आले असते तर त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले असते. पण त्यांच्या फेअर प्लेने त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळवून दिला.

जपान आणि पोलंड यांच्यातील ह गटातील अखेरच्या सामन्यात पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी राहिली. स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेल्या पोलंडने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. कामिल ग्रोसिस्कीने हेडरद्वारे केलेला प्रयत्न जपानचा गोलरक्षक इजी कावाशिमाने सुरेख अडवला. त्यामुळे पोलंडला आघाडी घेता आली नाही. जपानकडूनही बरेच प्रयत्न झाले, परंतु त्यांचीही गोलपाटी रिकामी राहिली. फेअर प्ले नियमावर बाद फेरीत प्रवेश करणारा जपान हा पहिलाच संघ ठरला आहे.

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८JapanजपानFootballफुटबॉलSportsक्रीडा