शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

FIFA Football World Cup 2018 : ... नेमारने करून दाखवलं; ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 21:35 IST

ब्राझीलला मेक्सिकोवर २-० असा सहज विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला.

ठळक मुद्दे लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला जे जमलं नाही ते नेमारने करून दाखवले.

समारा : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला जे जमलं नाही ते नेमारने आज करून दाखवले. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर नेमारने ब्राझीलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे ब्राझीलला मेक्सिकोवर २-० असा सहज विजय मिळवून फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला.

सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आले नाही. त्यामुळे मध्यंतरानंतर सामना ०-० या बरोबरीत सुरु झाला. पण मध्यंतरानंतर सहाव्या मिनिटालाच नेमारने गोल केला आणि ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. नेमार चेंडू मेक्सिकोच्या गोलजाळ्यापर्यंत घेऊन गेला आणि त्यानंतर विलियनकडे चेंडू सुपूर्द केला. त्यानंतर विलियनने काही क्षणात चेंडू पुन्हा एकदा नेमारकडे दिला. नेमारने कोणतीही चुक न करता यावेळी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.

पहिला गोल झाल्यावर ब्राझीलच्या संघाने काही काळ बचावावर भर दिला. सामन्याच्या ८६व्या मिनिटाला राबिर्टो फर्मिनोला खेळायला मैदानात पाचारण केले. त्यानंतर दोन मिनिटांनीच फर्मिनोने गोल केला. नेमारने यावेळी चांगल्या पद्धतीने चेंडू टोलवत तो मेक्सिकोच्या गोलजाळ्यापर्यंत घेऊन गेला. त्यानंतर त्याने फर्मिनोकडे चेंडू सुपूर्द केला. त्यामुळे मैदानात आल्यावर दोन मिनिटांमध्येच फर्मिनोला गोल करता आला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८NeymarनेमारBrazilब्राझीलMexicoमेक्सिकोFootballफुटबॉलSportsक्रीडाrussiaरशिया