FIFA Football World Cup 2018 : पॅकरमन यांनी केली फाल्काओची पाठराखण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:59 IST2018-06-26T06:59:11+5:302018-06-26T06:59:19+5:30
कोलंबियाचे प्रशिक्षक जोस पॅकरमन यांनी फुटबॉल विश्वचषकाच्या साखळी सामन्यात पोलंडविरुद्ध ३-० गोलच्या विजयानंतर संघाचा स्टार स्ट्रायकर राडेमल फाल्काओ याची पाठराखण केली.

FIFA Football World Cup 2018 : पॅकरमन यांनी केली फाल्काओची पाठराखण
कजान एरेना : कोलंबियाचे प्रशिक्षक जोस पॅकरमन यांनी फुटबॉल विश्वचषकाच्या साखळी सामन्यात पोलंडविरुद्ध ३-० गोलच्या विजयानंतर संघाचा स्टार स्ट्रायकर राडेमल फाल्काओ याची पाठराखण केली. फाल्काओ आगामी सामन्यात आणखी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास पॅकरमन यांनी व्यक्त केला.
काल झालेल्या सामन्याच्या ७० व्या मिनिटाला सँटियागो एरियासने क्विटेरोकडे पास दिला हा पास फाल्कोकडे देण्यात आला आणि फाल्काओने पोलंडच्या गोलरक्षकाला चकवताना गोल केला. हा कोलंबियाचा दुसरा गोल होता. सामन्यानंतर पॅकरमन यांना जेव्हा ३२ वर्षीय फाल्काओच्या गोलविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘मला वाटते आज आम्ही जे पाहिले तो आमच्यासाठी सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी एक होता.’’ फाल्काओ ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता; परंतु या विश्वचषकात गोल करण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले. पॅकरमन म्हणाला, ‘‘तो आमच्या संघाचे व कोलंबिया फुटबॉलचे प्रतीक आहे. तो गोल करेल याचा आम्हाला नेहमी विश्वास होता.