शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

FIFA Football World Cup 2018 : विजयानंतर ब्राझीलचा ‘सांबा’ जल्लोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 01:36 IST

सर्बियावर २-० ने मात, माजी विश्वविजेत्यांची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

ठळक मुद्देशानदार विजयानंतर ब्राझीलने यंदाच्या विश्वचषकातही उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. आता त्यांचा पुढील सामना सोमवारी मेक्सिकोविरुद्ध होईल.

मॉस्को : पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मुकुट मोठ्या दिमाखात प्राप्त करणाऱ्या ब्राझीलने सर्बियाचा २-० ने पराभव केला. ३५ व्या मिनिटाला पावलिन्हो याने तर ६८ व्या मिनिटाला टिएगो सिल्वा याने गोल नोंदवला. या शानदार विजयानंतर ब्राझीलने यंदाच्या विश्वचषकातही उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. आता त्यांचा पुढील सामना सोमवारी मेक्सिकोविरुद्ध होईल. नेयमारच्या नेतृत्वात विजयी झालेल्या ब्राझीलच्या खेळाडूंनी मैदानात ‘सांबा’ जल्लोष केला.

 

स्पार्टक स्टेडियमवर झालेल्या ‘ई’ गटातील सामन्यात ब्राझीलने सर्बियाविरुद्ध आज नेहमीपेक्षा वेगळीच व्यूव्हरचना आखली होती. सामन्याच्या सुरुवातीपासून ब्राझीलने अतंत्य शांत आणि संयमी खेळ केला. प्रतिस्पर्धी संघालाही त्यांनी संधी मिळू दिल्या नाहीत. उलट ब्राझीलला पहिल्या हाफमध्ये तीन-चार संधी मिळाल्या होत्या. स्टार खेळाडू नेयमार यानेही संधी दवडल्या. सामन्यात १७ व्या मिनिटापर्यंत चेंडू मध्यभागातच होता. ब्राझील जणू पासिंगचा सराव करीत असल्याचे जाणवत होते. ते संधीच्या शोधात होते. २४ व्या मिनिटाला मिळालेली संधीसुद्धा नेयमारने घालवली. जर्सी नंबर ९ या खेळाडूने नेयमारला पास दिला होता. यावर नेयमारने डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर चेंडूला गोलरक्षकाने ढकलून दिशाहीन ठरवले. ३५ व्या मिनिटाला कुतिन्होने बचावपटूंना भेदत धावत येत चेंडू पावलिन्होकडे दिला. चेंडू उसळल्याने पावलिन्हो याने गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला जाळीत ढकललेआणि ब्राझीलने आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत कायम राखली. 

 

टिएगो सिल्वाचा शानदार हेडर...दुसºया सत्रात ब्राझीलने आक्रमक पवित्रा घेतला. दुसºया बाजूने सर्बियानेसुद्धा संधी निर्माण केल्या होत्या. मात्र, आजचा दिवस ब्राझीलचाच होता. सर्बियाच्या जवळ आलेल्या संधी हुकत गेल्या. ६८ व्या मिनिटाला नेयमारने सामन्यातील दुसरी कॉर्नर किक लगावली. चेंडू सरळ गोलजाळ्याकडे गेला. संधीची वाट बघत सज्ज असलेल्या टिएगो सिल्वा याने उंच उडी घेत उत्कृष्ट हेडरद्वारे चेंडूला जाळीत ढकलले. या गोलनंतर सर्बियावर दडपण आले होते. सामन्यात नेयमारला दुसºया सत्रात तीन संधी मिळाल्या होत्या. मात्र, त्या थोडक्यात हुकल्या. 

असा आहे रेकॉर्ड...गेल्या चार विश्वचषकांच्या साखळी सामन्यांत ब्राझीलने एकही सामना गमावला नाही. हा त्यांचा विक्रमच आहे. त्यांनी विश्वचषकाच्या साखळीत आतापर्यंत ३८ सामने खेळले आहेत. त्यांनी २९ सामने जिंकले आणि आठ ड्रॉ केले. सर्बियाविरुद्धदेखील त्यांना विजय किंवा ड्रॉची गरज होती. ब्राझीलचा स्वित्झर्लंडविरुद्ध पहिला सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. दुसºया सामन्यात त्यांनी कोस्टारिकाला २-० ने पराभूत केले होते. या दोघांतील गेल्या चार सामन्यांत ब्राझीलने एक सामना जिंकला आहे. तर तीन बरोबरीवर आटोपले. ब्राझीलने सर्बियाविरुद्ध ४ तर सबिर्याने ब्राझीलविरुद्ध २ गोल नोंदवले होते.

टॅग्स :Brazilब्राझीलFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलNeymarनेमार