शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

FIFA FOOTBALL World Cup 2018: अन् निळी अंडरवेअर ठरतेय ' त्या ' फुटबॅलपटूला लकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 20:23 IST

या विश्वचषकात एका खळाडूला वाटते की, आपण जर निळ्या रंगाची अंडरवेअर घातली तर आपल्याला यश मिळेल.

ठळक मुद्देकाही महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी गोमेझला त्याचे सहकारी परफ्यूम लावत असल्याची गोष्टही समजली आहे.

मॉस्को : श्रद्धा आणि अंधश्रद्धा या काही व्यक्तींच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतात. एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर ती व्यक्ती काही खास गोष्टी करतात. कामगिरीच्या जोरावर विजय मिळवणारे खेळाडूही या गोष्टीला अपवाद नाहीत. पण यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात तर काही खेळाडूंनी अंधश्रद्धेचा कळस गाठला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण या विश्वचषकात एका खळाडूला वाटते की, आपण जर निळ्या रंगाची अंडरवेअर घातली तर आपल्याला यश मिळेल. हा खेळाडू आहे तरी कोण, याची उत्सुकता तुम्हालाही असेलंच.

प्रत्येक खेळाडूला विश्वचषकात विजय मिळवायचा असतो. त्यासाठी आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी बदलण्याकडे या खेळाडूंचा कल असल्याचे दिसून आले आहे. कोलंबियाचा गोलरक्षक रॅने हिगुईटा हादेखील असाच एक खेळाडू. आपली कामगिरी चांगली व्हावी, यासाठी तो निळ्या रंगाची अंडरवेअर घालून मैदानात उतरतो. ही गोष्ट त्याने काही आपल्या सहकाऱ्यांना सांगितली आहे. पण अशा गोष्टी करणारा तो एकमेव खेळाडू नक्कीच नाही.

जर्मनी संघाचा आक्रमणपटू मारियो गोमेझ हादेखील चांगली कामगिरी करण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी करतो. चांगली कामगिरी करण्यासाठी गोमेझ हा डाव्या बाजूला असलेले टॉयलेट वापरतो. काही महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी गोमेझला त्याचे सहकारी परफ्यूम लावत असल्याची गोष्टही समजली आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी काही खेळाडू पांढऱ्या रंगाची जर्सी वापरतात, तर काही खेळाडू सामन्यापूर्वी टक्कल पडलेल्या माणसाच्या डोक्यावरून हात फिरवतात. या साऱ्या गोष्टी ऐकाव्या तेवढं नवलंच वाटत राहतं, पण या गोष्टी घडतात एवढं मात्र नक्की.