शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

FIFA Football World Cup 2018 : रोनाल्डोला रोखण्याचे उरुग्वेचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 01:32 IST

रोनाल्डो सुपरस्टार असला तरी अन्य खेळाडूंसारखा आम्ही त्याच्यावरही वचक ठेवू. पण एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करून डावपेच आखले जात नाहीत, असे उरुग्वेचे मत आहे.

ठळक मुद्देपोर्तुगालविरुद्ध होणाऱ्या उपउपांत्यपूर्व लढतीत प्रतिस्पर्धी स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याला रोखण्याचे लक्ष्य उरुग्वेचा कर्णधार दिएगो गॉडिन याने आखले आहे.

सोची : पोर्तुगालविरुद्ध होणाऱ्या उपउपांत्यपूर्व लढतीत प्रतिस्पर्धी स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो याला रोखण्याचे लक्ष्य उरुग्वेचा कर्णधार दिएगो गॉडिन याने आखले आहे.

उरुग्वे संघ रियाल माद्रिदचा स्टार रोनाल्डोला टार्गेट करणार असून दुसरीकडे ३३ वर्षांचा रोनाल्डो हा देखील शानदार फॉर्ममध्ये आहे. पण उरुग्वे या स्पर्धेत एकमेव असा संघ आहे, ज्याने एकही गोल होऊ न देता बाद फेरीत प्रवेश निश्चित केला. एटलेटिको संघाकडून खेळणाऱ्या गॉडिनचा बचाव युरोपियन क्लब संघात सर्वांत चांगला आहे.  २०१८ मध्ये उरुग्वेने सहा सामन्यात आपल्याविरुद्ध एकही गोल होऊ दिला नाही, हे विशेष. रोनाल्डो सुपरस्टार असला तरी अन्य खेळाडूंसारखा आम्ही त्याच्यावरही वचक ठेवू. पण एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करून डावपेच आखले जात नाहीत, असे उरुग्वेचे मत आहे.

स्पेनविरुद्ध केलेल्या हॅट्ट्रिकसह रोनाल्डोने स्पर्धेत चार गोल नोंदविले. युरोपियन खेळाडूंमध्ये त्याचे सर्वाधिक ८५ गोल आहेत. गॉडिनच्या एटलेटिकोविरुद्ध त्याने दोन वर्षांत दोनदा हॅट्ट्रिक केली असून चॅम्पियन्सचे दोनदा जेतेपद मिळवून दिले.प्रतिस्पर्धी उरुग्वे संघ शानदार आहे. संघात गॉडिनसह रॉड्रिगो बेंटानकुर, लुकास टोरेरा आणि माटियास वेसिनोसारखे मिडफिल्डर आहेत. याशिवाय लुई सुआरेज आणि एडिन्सन कावानी हे गोल नोंदविणारे खेळाडू आहेत. सुआरेज आधीसारखा चपळ नसला तरी रशियात त्याने दोन गोल नोंदविले. पोर्तुगालचे कोच फर्नांडो सँटोस यांना देखील  रोनाल्डोसह युवा खेळाडू बर्नार्डो सिल्वा आणि गोंकालो गुएडेस यांच्याकडून बऱ्याच आशा आहेत. फ्रान्सने साखळीत तीनपैकी दोन सामने जिंकले तर एक सामना ड्रॉ झाला. अर्जेंटिनाला केवळ एक विजय नोंदविता आला. एक सामना गमविण्याची त्यांच्यावर नामुष्की आली तर एक सामना ड्रॉ झाला. वाढत्या वयाचे खेळाडू आणि संतुलितपणाचा अभाव यामुुळे अर्जेंटिना त्रस्त आहे. क्रोएशियाविरुद्धच्या लढतीत या उणिवा चव्हाट्यावर आल्या होत्या. पण नायजेरियाविरुद्ध मेस्सीने नोंदविलेला गोल हे शुभसंकेत असल्याचे संघ व्यवस्थापनाला वाटते.दुसरीकडे फ्रान्स अपराजित आहे, पण सुस्त वाटतो. स्ट्रायकर एंटोजेन ग्रीजमन आतापर्यंत सर्वोत्कृष्ट खेळ करू शकला नाही. मधली फळी देखील अनेकदा विखुरलेली आढळली. तथापि, सामन्याआधी माझा संघ लय मिळविण्यात यशस्वी ठरेल, असा दावा फ्रान्सचे कोच डिडियर डिशचॅम्प यांनी केला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोUruguayUruguayPortugalपोर्तुगाल