शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

FIFA Football World Cup 2018 : 25 सामन्यांत 16 कर्णधार; या प्रशिक्षकाचा अजब फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 23:21 IST

रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीचा थरार संपला असून आत्तापर्यंत अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. मात्र ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे यांनी केलेला विक्रम हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ठळक मुद्देबेल्जियमविरूद्ध टिटे यांनी मिरांडाच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी टाकण्याची शक्यता आहे. 

मॉस्को - रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीचा थरार संपला असून आत्तापर्यंत अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. मात्र ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे यांनी केलेला विक्रम हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ब्राझील संघाला पुन्हा जेतेपद मिळवून देण्यासाठी टिटे संघात सर्व प्रयोग करून पाहात आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरी ते मुख्य स्पर्धेपर्यंत अशा एकूण 25 सामन्यांत टिटे यांनी 16 कर्णधार बदलले. त्यांची ही कर्णधारांची रोटेशन पॉलिसी भलतीच हिट ठरत आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरूद्ध टिटे यांनी मिरांडाच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी टाकण्याची शक्यता आहे. टिटे यांनी जून 2016 मध्ये प्रशिक्षकपदाचा कार्यभार हाती घेतला. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी 25 सामन्यांत 16 कर्णधार बदलले. मेक्सिकोविरूद्धच्या बाद फेरीच्या लढतीत थिएगो सिल्वाच्या नेतृत्वाखाली ब्राझिलने 2-0 असा विजय मिळवला होता. त्यांच्या या रोटेशन पॉलीसीवर प्रचंड टीका होत असली तरी ब्राझिलने विश्वचषक पात्रता स्पर्धेत 18 पैकी 12 सामने जिंकले, तर केवळ एका लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला. 5 सामने बरोबरीत सुटले. मुख्य स्पर्धेत 4 सामन्यांत 3 विजय आणि 1 बरोबरीचा निकाल लावण्यात त्यांनी यश मिळवले आहेत. मार्सेलोच्या दुखापतीमुळे शुक्रवारच्या लढतीत त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय टिटे घेणार नाहित. अशा परिस्थितीत फिलीप लुईस हा एकमेव खेळाडू राहतो की ज्याने टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्णधारपद भुषवलेले नाही.  मात्र टिटे बेल्जियमविरूद्ध मिरांडाला संधी देऊ शकतात. 

टिटेंच्या मार्गदर्शनाखाली कोणी, कितीवेळा कर्णधारपद भुषविले ?5  मिरांडा  (बेल्जियमविरूद्धच्या लढतीचा समावेश )4 डॅनी अॅलव्हेस* 3 थिएगो सिल्वा 2 मार्सेलो 1 रेनाटो ऑगस्टो, फिलीप लुईस, फर्नांडीनो, रॉबीनो*, नेयमार, फिलीप कुटिनो, पॉलिनो, कॅसेमिरो, मार्किनोस, विलियन, अॅलिसन, गॅब्रीयल जीजस  ( * विश्वचषक संघात समावेश नसलेले ) 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Brazilब्राझीलFootballफुटबॉलSportsक्रीडा