भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 03:54 IST2019-07-16T03:54:35+5:302019-07-16T03:54:37+5:30
उत्तर कोरियाने ताजिकिस्तानचा १-० असा पराभव केल्याने यजमान भारताचे इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात
अहमदाबाद : उत्तर कोरियाने ताजिकिस्तानचा १-० असा पराभव केल्याने यजमान भारताचे इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता मंगळवारी भारतीय संघ आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात सीरियाविरुद्ध विजय मिळवून विजयी सांगता करण्याच्या निर्धाराने खेळेल.
त्याचवेळी मंगळवारी सीरियाने भारताविरुद्ध बाजी मारली, तर ते अंतिम फेरीत धडक देतील. भारताचा ताजिकिस्तानविरुद्ध (२-४) व उत्तर कोरिया (२-४) पराभव झाला होता.