शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
3
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
4
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
5
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
6
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
7
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
8
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
9
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
10
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
11
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
12
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
13
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
14
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
15
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
16
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
17
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
18
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
19
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
20
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

दिल्लीच्या १५ वर्षीय फुटबॉलपटू मुलीचा ऑस्ट्रेलियात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 04:32 IST

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पॅसिफिक शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या दिल्लीच्या १५ वर्षीय फुटबॉलपटू मुलीचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या (एसजीएफआय) उच्च अधिका-याने याबाबत माहिती दिली.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पॅसिफिक शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या दिल्लीच्या १५ वर्षीय फुटबॉलपटू मुलीचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या (एसजीएफआय) उच्च अधिका-याने याबाबत माहिती दिली. फुटबॉल सामना संपल्यानंतर अ‍ॅडलेड येथील ग्लेनेग समुद्रकिनारी पाच फुटबॉलपटू मुली रविवारी समुद्रामध्ये उतरल्या होत्या. वेगवान लाटांचा अंदाज न आल्याने सर्व मुली वाहून गेल्या. त्यातील नितिशा नेगी या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.१८ वर्षांखालील पॅसिफिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी दोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार याच्या नेतृत्त्वाखाली एसजीएफआयने सहा क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय संघ निवडला होता. या खेळांमध्ये हॉकी, फुटबॉल आणि सॉफ्टबॉल यांचाही समावेश आहे. आॅस्टेÑलिया सरकार आणि आॅस्टेÑलियन शालेय क्रीडा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा संघटनेकडून मान्यता मिळाली नव्हती. या स्पर्धेसाठी भारताकडून १२० सदस्यांचा संघ सहभागी झाला होता.या वेळी समुद्रात वाहून गेलेल्या पाच मुलींपैकी चार मुलींना वाचविण्यात सुरक्षारक्षकांना यश आले. मात्र, सोमवारी सुरु केलेल्या शोधमोहिमेदरम्यान नितिशाचा मृतदेह सापडला. दखल घेण्याची बाब म्हणजे नितिशाचा मृतदेह अशा ठिकाणी सापडला, जेथे गतवर्षी दोन मुले बुडाली होती. क्रीडा मंत्रालयाने या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.(वृत्तसंस्था)आॅस्टेÑलियाच्या ग्लेनेग समुद्रकिनाºयाहून वाईट बातमी मिळाली आहे. क्रीडामंत्री विदेश मंत्रालय आणि विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्कात आहोत. भारतीय उच्च आयोगही सर्व सहकार्य करत आहे. पुढील चौकशीचे आम्ही आदेश दिले आहेत, असे भारतीय क्रीडा मंत्रालयाने या दुर्दैवी घटनेनंतर टिष्ट्वट केले.याप्रकरणी, ‘एसजीआयएफ’चे महासचिव राजेश मिश्रा यांनी स्थानिय अधिकाºयांनी त्या मुलीचे शव ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, ‘आॅस्टेÑलियाकडून मिळालेल्या संदेशानुसार त्यांनी मोठ्या स्तरावर सुरू केलेल्या शोधमोहिमेअंतर्गत मुलीचे शव ताब्यात घेतले आहे. ही खूप दुर्दैवी घटना असून मुलीच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. भारतात परतण्याआधी संघ व्यवस्थापनाने मुलींना समुद्रकिनारी नेले होते. या वेळी फुटबॉल संघातील पाच मुली सेल्फी घेण्यासाठी खूप पुढे गेल्या होत्या. या वेळी मोठ्या लाटांचा अंदाज न आल्याने सर्वांचा तोल गेला आणि पाचही जणी लाटांमध्ये वाहून गेल्या.’ या वेळी स्थानिक सुरक्षा कर्मचाºयांनी भारतीय संघातील ४० खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या सहकार्याने चौघींना वाचविण्यात यश मिळवले.मिश्रांनी म्हटले, ‘यानंतर लगेच चौघींना हेलिकॉप्टरमधून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पाचवी मुलगी बेपत्ता होती. तिच्या शोधासाठी अधिकाºयांनी मोहीम आखली आणि मी अधिकृतरीत्या माहिती देत आहे, ‘त्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी मिळाला.’

टॅग्स :Deathमृत्यू