भारतीय फुटबॉलचा सहभाग निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:48 IST2018-06-18T03:48:54+5:302018-06-18T03:48:54+5:30
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय फुटबॉल संघाला परवानगी मिळाली आहे.

भारतीय फुटबॉलचा सहभाग निश्चित
नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय फुटबॉल संघाला परवानगी मिळाली आहे. त्याचवेळी भारताच्या महिला संघाला मात्र अद्यापही स्पर्धेत सहभागी होण्याबाबतच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. नुकताच झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाइन यांनी काही भारताच्या संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठविण्यात यावे अशी सरकारकडे विनंती केली होती.
आॅल इंडिया फुटबॉल फेडरशनच्या (एआयएफएफ) सूत्राने म्हटले, ‘अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने अधिकृत माहिती दिली आहे. पुरुष संघाचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभाग निश्चित झाला. महिला संघाला मात्र, अद्यापही प्रतीक्षा करावी लागणार आहे.’
प्रशिक्षक कॉन्स्टेनटाइन आता जुलै महिन्यात राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करतील.