आय लीगमधील विदेशी खेळाडूंच्या संख्येत कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 03:56 IST2018-06-21T03:56:05+5:302018-06-21T03:56:05+5:30
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आय लीग क्लबसाठी सहा विदेशी खेळाडूंमध्ये एक खेळाडू आशियाई असावा ही अट काढून टाकली आहे.

आय लीगमधील विदेशी खेळाडूंच्या संख्येत कपात
नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आय लीग क्लबसाठी सहा विदेशी खेळाडूंमध्ये एक खेळाडू आशियाई असावा ही अट काढून टाकली आहे. २०१९-२० सत्रासाठी विदेशी खेळाडूंची संख्या पाचपर्यंत मर्यादित केली. एआयएफएफच्या लीग समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. विदेशी खेळाडूंबाबत समितीने मागच्या वर्षीचा नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
आशियाई खेळाडूंचा कोटा रद्द ठरविला आहे. २०१८-१९ या सत्रात मात्र संघांना सहा विदेशी खेळाडू खेळविण्याची मुभा असेल. पुढील सत्रात मात्र ही संख्या पाच असेल.