शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्वीकारली ही मोठी ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 21:24 IST

पोर्तुगालचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेर स्पॅनिश क्लब रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी दिली.

माद्रिद - ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि रेयाल माद्रिद 2009 पासून जोडले गेलेले नाते नऊ वर्षांनी मंगळवारी अखेरीस संपुष्टात आले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर रोनाल्डो माद्रिद क्लबला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा गेला आठवडाभर सुरू होत्या. त्या चर्चाच ठराव्या अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना होत्या. पण, तसे झाले नाही, रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंट्सची 88 मिलियन पौंडची म्हणजेच भारतीय रकमेत 800 कोटी रूपयांची ऑफर स्वीकारली. रेयाल माद्रिद क्लबने त्यांच्या अधिकृत साईटवर त्याबाबतची घोषणा केली. माद्रिद क्लबशी चर्चा करूनच रोनाल्डोने हा निर्णय घेतला. युव्हेंट्स क्लबचे अध्यक्ष आंद्रेया अँजेली हे मंगळवारी दुपारी खासगी विमानाने रोनाल्डोला भेटण्यासाठी ग्रीसमध्ये दाखल झाले. रोनाल्डो कुटुंबासमवेत येथे फिरण्यासाठी आलेला आहे. तेथेच युव्हेंट्स आणि रोनाल्डो यांच्यात करार झाला. त्याला चार वर्षांसाठी युव्हेंट्सकडून 4.55 लाख रूपये प्रती आठवड्याला मिळणार आहेत. त्यानंतर रेयाल माद्रिद क्लबनेही या वृत्ताला दुजोरा दिला. रोनाल्डोने नऊ वर्षांत माद्रिदसोबत चॅम्पियन्स लीगची चार जेतेपद नावावर केली आहेत. यापलिकडे त्याने या नऊ वर्षांत अनेक विक्रम नोंदवले आहेत.  रोनाल्डोनेही माद्रिदला भावनिक पत्र लिहून निरोप घेतला. आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचे क्षण या क्लबसोबत घालवल्याचे त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला, आयुष्यात नवा अध्यायाला सुरूवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळेच माद्रिद क्लबने हा निर्णय स्वीकारावा अशी विनंती मी त्यांना केली होती. या निर्णयाने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आले असतील, कृपया मला समजून घ्या.  रेयाल माद्रिद आणि रोनाल्डो450 - रोनाल्डोने 438 सामन्यांत रेयाल माद्रिदसाठी 450 गोल केले 17 - चॅम्पियन्स लीगच्या 2013-14 या सत्रात विक्रमी 17 गोल 105 - रेयाल माद्रिदसाठी चॅम्पियन्स लीगमध्ये एकूण 105 गोल04 - रेयालसाठी चॅम्पियन्स लीगची चार जेतेपद311 - ला लिगा स्पर्धेत 311 गोल02 - ला लिगाची दोन जेतेपद 2011-12 आणि 2016-1716 - एकूण 16 चषक04 - चार बॅलोन डी ओर पुरस्कार44 - माद्रिदकडून 44 हॅट्ट्रिक  

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलSportsक्रीडा